वृत्तसंस्था
श्रीनगर – जम्मू – काश्मीरमधून ३७० कलम आणि ३५ ए कलम हटविल्यानंतर भारतीय सैन्य दलांनी अनेक सकारात्मक पावले उचलली आहेत. यातला एक अत्यंत महत्त्वाचा उपक्रम आज केला. Lt Gen DP Pandey, GoC Chinar Corps, along with GoC Victor Force, Maj Gen Rashim Bali and IGP Kashmir, Mr Vijay Kumar, addressed 83 family members
भारतीय सैन्य दलाच्या अधिकाऱ्यांनी सध्या विविध दहशतवादी कारवायांमध्ये गुंतलेल्या मुलांच्या पालकांशी आणि कुटुंबातील सदस्यांशी सैन्य दलाने थेट संवाद साधला आहे. सैन्य दलांकडे आणि जम्मू – काश्मीर पोलीसांकडे असलेल्या दहशतवाद्यांच्या यादीपैकी ८३ जणांच्या कुटुंबीयांशी आणि पालकांशी चिनार कॉर्पसचे लेफ्टनंट जनरल डी. पी. पांडे, व्हीक्टर फोर्सचे मेजर जनरल रेशीम बाली आणि काश्मीरचे पोलीस महानिरीक्षक विजय कुमार यांनी शोपियांमध्ये संवाद साधला.
भारतीय सैन्य दल आणि पोलीस या कुटुंबीयांना सर्व मदत करायला तयार आहे. त्यांनी आपल्या मुलांना दहशतवादाचा मार्ग सोडून देण्यास सांगावे. प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन लेफ्टनंट जनरल पांडे, मेजर जनरल बाली आणि विजय कुमार यांनी केले.
सुरक्षा दलांनी चकमकीत मारलेला काश्मीरी दहशतवादी बुऱ्हान वाणी याच्या वडिलांच्या हस्ते यंदा स्वातंत्र्य दिनी काश्मीरमधल्या एका शाळेत ध्वजारोहण करण्यात आले होते, याची आठवण मेजर जनरल बाली यांनी यावेळी दहशतवाद्यांच्या कुटुंबीयांना आणि पालकांना आवर्जून करून दिली.
Lt Gen DP Pandey, GoC Chinar Corps, along with GoC Victor Force, Maj Gen Rashim Bali and IGP Kashmir, Mr Vijay Kumar, addressed 83 family members
महत्त्वाच्या बातम्या
- अमेरिकी सैन्याच्या पूर्ण माघारीनंतर तालिबान्यांनी केला जल्लोष, काबूलमधली शाळकरी चिमुरडी म्हणते, भीती वाटत नाही!
- मोठी बातमी : सुप्रीम कोर्टाचा सुपरटेक एमराल्डला दणका, 40 मजली दोन्ही टॉवर पाडण्याचे, खरेदीदारांना व्याजासह पैसे परत करण्याचे आदेश
- Bollywood Drug Case : अरमान कोहलीच्या मोबाइलमधून धक्कादायक खुलासा, पेरू-कोलंबियाहून ड्रग्जचा पुरवठा; मोठ्या ड्रग कार्टेलशी संबंध