प्रतिनिधी
हिंगोली : देशभरात लव्ह जिहाद आणि आफताब पूनावालाने केलेली श्रद्धा वालकरची हत्या हे प्रकरण ताजे असतानाच आणखी एक लव्ह जिहादची धक्कादायक घटना हिंगोलीमधून समोर आली आहे. लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये असलेल्या तरुणीवर धर्मांतराचा दबाव आणून वर तिला जिवे मारण्याची धमकी देणाऱ्या साजिद रफीकखान पठाणला त्याचा “नवा आफताब” तयार होण्यापूर्वीच महाराष्ट्र पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. Love Jihad : Muslim man pressuriesd girl to convert to Islam, hingoli police arrested him
साजिद रफीकखान पठाण हा या तरुणी बरोबर हिंगोलीत लिव्ह इन मध्ये राहत होता. परंतु तरुणीने लग्नासाठी आग्रह धरल्यानंतर त्याने तिच्यावर इस्लाम मध्ये धर्मांतरित होण्यासाठी दबाव आणला. तिने नकार दिल्यानंतर तिला जिवे मारण्याची धमकी देखील दिली. या प्रकरणी पीडित तरुणीने वेळीच पोलिसांकडे धाव घेतली. तिच्या तक्रारीनंतर वेगाने चक्रे फिरली. हिंगोली पोलिसांनी आरोपी साजिद रफिक खान पठाण याला ताबडतोब ताब्यात घेऊन बेड्या ठोकल्या आहेत.
तरुणीवर अत्याचार
आरोपी साजिद रफीकखान पठाण हा हिंगोलीच्या कळमनुरी तालुक्यातील जवळा पांचाळ येथील रहिवासी आहे. साजिदने पीडित तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेले. त्यानंतर तो तिच्याबरोबर लिव्ह इन मध्ये राहू लागला. त्यानंतर साजिदने या तरुणीवर डोंगरकडा, औरंगाबाद, फरीदाबाद, दिल्ली अशा विविध ठिकाणी फिरायला नेले. पण तिथे तिच्यावर अत्याचार केले. दोन महिन्यानंतर हे दोघेही डोंगरकडा येथे परत आले. त्यानंतर साजिदने या तरुणीवर धर्मांतरासाठी दबाव आणला आणि तिने विरोध केल्यानंतर तिला जिवे मारण्याची धमकी देखील दिली.
आरोपीविरोधात गुन्हा दाखल
पीडित तरुणीने वेळीच सावध होऊन साजिद रफीकखान पठाण विरुद्ध आखाडा बाळापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीनंतर आखाडा बाळापूर पोलिसांनी लगेच आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला असून, त्याला काल रात्रीच ताब्यात घेऊन बेड्या ठोकल्या.
Love Jihad : Muslim man pressuriesd girl to convert to Islam, hingoli police arrested him
महत्वाच्या बातम्या
- काशी तमिळ संगम : काशी विश्वनाथ मंदिर ट्रस्टवर के. वेंकट रमण गणपती पहिले तमिळ ट्रस्टी
- ज्याच्या नामांतराने सत्ता गमावली, त्या विद्यापीठाने डॉक्टरेट दिल्यावर शरद पवार भावूक; पण सत्तांतराचे ते एकमेव कारण?
- लव्ह जिहाद : म्हणे “त्याला” मारू नका पोलिसी दंडे; पण आफताबला वाचविण्याचे अनेक फंडे!!
- ISRO ने रचला इतिहास; पहिले खासगी राॅकेट विक्रम-S प्रक्षेपित; वाचा वैशिष्ट्ये
- सावरकरांच्या अपमानापूर्वी आणि नंतर : उद्धव गटाची मध्यावधी निवडणुकीची पेरणी, ते आता महाविकास आघाडीत फुटीचा इशारा