• Download App
    भगवान श्रीराम, तुमच्या चरणी कल्याण सिंह यांना स्थान द्या'; अंत्यदर्शनावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भावनिक उदगार |Lord Shriram, Kindly give place to Kalyan Singh at your feet '; Prime Minister Narendra Modi's emotional outburst at the funeral

    भगवान श्रीराम, तुमच्या चरणी कल्याण सिंह यांना स्थान द्या’; अंत्यदर्शनावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भावनिक उदगार

    वृत्तसंस्था

    लखनौ : ”भगवान श्रीराम, तुमच्या चरणी कल्याणसिंह यांना स्थान द्या’; अशा भावनिक शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कल्याणसिंह यांना श्रद्धांजली वाहिली.Lord Shriram, Kindly give place to Kalyan Singh at your feet ‘; Prime Minister Narendra Modi’s emotional outburst at the funeral

    भाजपचे वरिष्ठ नेते आणि उत्तरप्रदेशाचे माजी मुख्यमंत्री कल्याणसिंह यांचे शनिवारी प्रदीर्घ आजाराने निधन झाले. राममंदिर आंदोलनात त्यांचा सिंहाचा वाटा होता. मंदिरासाठी त्यांनी मुख्यमंत्रीपदाचा त्याग केला होता. अशा रामभक्तांचे निधन झाल्याने तमाम हिंदूंना अतीव दुःख झाले. आज लखनौ येथील मॉल एव्हन्यू या निवासस्थानी त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवले आहे.



    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सह मान्यवर कल्याणसिंह यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी लाखनौला आले. पंतप्रधान मोदी यांनी आपली सर्व कामे बाजूला सारून लखनौ येथे धाव घेतली.त्यावेळी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा, प्रदेशाध्यक्ष स्वतंत्र सिंह उपस्थित होते.

    कल्याणसिंह यांच्या कुटुंबातील सदस्यांना भेटल्यानंतर पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘आम्ही सर्व त्यांचे आदर्श आणि संकल्प पूर्ण करण्यासाठी कठोर परिश्रम करू. भगवान श्री राम त्यांच्या दिवंगत आत्म्याला त्यांच्या चरणी स्थान देवो.

    पत्रकारांशी बोलताना मोदी म्हणाले, कल्याणसिंहजींनी आपले नाव सार्थ केले आणि आयुष्यभर लोकांसाठी काम करताना नेहमी लोककल्याणाला प्राधान्य दिले. ते सर्वसामान्यांसाठी प्रेरणास्थान बनले. कल्याण सिंह यांचा आदर्श आणि संकल्पांपासून प्रेरणा घेऊन जास्तीत जास्त प्रयत्न करावेत आणि त्यांची स्वप्ने पूर्ण करण्याचा प्रयत्न करण्यात कोणतीही कसर ठेवू नका, असे आवाहन त्यांनी केले.

    Lord Shriram, Kindly give place to Kalyan Singh at your feet ‘; Prime Minister Narendra Modi’s emotional outburst at the funeral

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    PM Dhan-Dhanya Krishi Yojana : केंद्राची पंतप्रधान धन-धान्य कृषी योजनेला मंजुरी; कमी कृषी उत्पादन असलेल्या 100 जिल्ह्यांवर लक्ष; 1.7 कोटी शेतकऱ्यांना फायदा

    RBI Governor : सरकार व्याजदरात आणखी कपात करू शकते; RBI गव्हर्नर म्हणाले- GDP डेटामध्ये मंदी असल्यास कमी केले जाऊ शकतात व्याजदर

    CDS Anil Chauhan : सीडीएस म्हणाले- कालच्या शस्त्रांनी तुम्ही आजचे युद्ध जिंकू शकत नाही; सुरक्षेसाठी गुंतवणूक गरजेची