• Download App
    लॉर्ड माऊंटबॅटन - लेडी माउंटबॅटन यांच्या डायऱ्यांमध्ये आणि पत्रांमध्ये अशी कोणती सिक्रेट्स आहेत जी ब्रिटिश सरकार दडवू इच्छिते??|Lord Mountbatten - What are the secrets in Lady Mountbatten's diaries and letters that the British government wants to hide

    लॉर्ड माऊंटबॅटन – लेडी माउंटबॅटन यांच्या डायऱ्यांमध्ये आणि पत्रांमध्ये अशी कोणती सिक्रेट्स आहेत जी ब्रिटिश सरकार दडवू इच्छिते??

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : भारताला स्वातंत्र्य कसे मिळाले?, या विषयावर खुद्द भारतात वादविवादाचा गदारोळ उठला असताना ज्या देशाच्या गुलामगिरीतून भारत सुटला, त्या देशात भारताच्या स्वातंत्र्याचे जे रहस्य दडले आहे ते रहस्य उलगडण्यासाठी एक ब्रिटिश इतिहासकार ब्रिटिश सरकारची झगडत आहेत…!!Lord Mountbatten – What are the secrets in Lady Mountbatten’s diaries and letters that the British government wants to hide

    या झगडण्यात त्यांना 98 टक्क्यांच्या वर यश मिळवले आहे, पण दीड दोन टक्क्यांसाठी ते अजून ब्रिटिश सरकारची लढत आहेत अँड्र्यू ल्युईन असे या ब्रिटिश इतिहासकारांचे नाव आहे. भारताला स्वातंत्र्य देण्याच्या प्रक्रियेचा अभ्यास करताना त्यांना भारताचे शेवटचे व्हाईसरॉय लॉर्ड माऊंटबॅटन आणि त्यांची पत्नी लेडी एडविना माऊंटबॅटन यांच्या व्यक्तिगत डायर्‍या आणि पत्रे हवी आहेत. त्यामध्ये भारताच्या स्वातंत्र्याचे “खरे रहस्य” दडले असल्याचे म्हटले जात आहे.



    लेडी एडविना माऊंटबॅटन आणि भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यात प्रेमसंबंध असल्याच्या चर्चा भारत आणि ब्रिटनमध्ये चविष्टपणे अनेक वर्षे होत राहिल्या आहेत. त्यावर माउंटबॅटन यांची कन्या पामेला हिने देखील प्रकाश टाकला आहे.

    पण अँड्र्यू ल्युईन हे ज्या डायऱ्या आणि पत्रे मिळवण्यासाठी झगडत आहेत, ते दस्तऐवज नेमक्या स्वरूपात 1947 आणि 48 या दोन वर्षांमधले आहेत, जेव्हा भारताला स्वातंत्र्य देण्यात आले आणि भारताची फाळणी करण्यात आली…!! लॉर्ड माउंट बॅटन आणि लेडी माऊंटबॅटन यांच्या या डायऱ्यांमध्ये आणि पत्रांमध्ये कदाचित भारताला स्वातंत्र्य देण्याच्या प्रक्रियेचे “रहस्य” दडले असावे.

    कदाचित यामध्ये लॉर्ड माउंटबॅटन, महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, मौलाना आझाद, बॅ. महंमद अली जीना आणि फाळणीच्या वेळी भारत-पाकिस्तान यांच्यातील सीमारेषा आखणारे सेरील रॅडक्लिफ यांच्या संदर्भात काही “रहस्यमय” उल्लेख असू शकतील, असे इतिहासकार अँड्र्यू ल्युईन यांना वाटत आहे. त्यामुळे ते ब्रिटिश सरकारकडे या महत्त्वाच्या डायर्‍या आणि पत्रे खुल्या करण्याची मागणी करत आहेत.

    परंतु ब्रिटिश सरकारने ब्रिटनच्या कोर्टात सहा लाख पाउंड खर्च करत ही मागणी अमान्य केली आहे. लॉर्ड माऊंटबॅटन आणि लेडी माऊंटबॅटन यांच्या डायर्‍या आणि पत्रे सर्वांना पाहण्यासाठी आणि वाचण्यासाठी खुली केली तर ब्रिटन आणि भारत – पाकिस्तान यांच्या संबंधांवर त्याचा दुष्परिणाम होऊ शकतो तसेच ब्रिटिश राजघराण्याशी संबंधित काही गोष्टी अनावश्यकपणे बाहेर येऊ शकतात, असा युक्तिवाद ब्रिटिश सरकारच्या वतीने कोर्टात करण्यात आला आहे.

    त्यामुळे लॉर्ड माऊंटबॅटन आणि लेडी माऊंटबॅटन यांच्या डायर्‍या आणि पत्रांचे रहस्य अधिकच गडद झाले आहे. त्यांच्या आणि भारतीय नेत्यांच्या वैयक्तिक जीवनापेक्षा या डायर्‍यांमध्ये भारताच्या स्वातंत्र्य प्रक्रियेशी संबंधित आणि फाळणी प्रक्रियेशी संबंधित काही वेगळी रहस्ये दडली आहेत का?, हे पाहणे अधिक महत्त्वाचे आहे. या प्रकरणाचा लवकरच निकाल लागण्याची अपेक्षा आहे.

    Lord Mountbatten – What are the secrets in Lady Mountbatten’s diaries and letters that the British government wants to hide

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Delhi High Court पत्नीला पतीची संपत्ती मानण्याची कल्पना असंवैधानिक; दिल्ली उच्च न्यायालयाने दिला महाभारतातील द्रौपदीचा संदर्भ

    मुर्शिदाबाद मधील दंगल पीडित महिलांच्या संरक्षणाची जबाबदारी बंगाल सरकारची, त्यात राजकारण आणि कुचराई नको; NCW अध्यक्षांनी सुनावले!!

    बंगाल आणि बांगलादेश यांच्यातला फरक पुसला; पश्चिम बंगाल राज्य निर्मितीचा हेतूच ममतांनी उद्ध्वस्त केला!!