• Download App
    श्री हनुमानाचा जन्म हा तिरुपतीचाच, हंपीचा दावा सिद्ध होऊ शकला नसल्याचे मत।Lord Hanuman born in Tirupati

    श्री हनुमानाचा जन्म हा तिरुपतीचाच, हंपीचा दावा सिद्ध होऊ शकला नसल्याचे मत

    विशेष प्रतिनिधी

    हैदराबाद – श्री हनुमान यांचा जन्म तिरुपती येथील अंजनाद्री पर्वतावर झाल्याचे पुरावे स्पष्टपणे पुराण आणि धार्मिक ग्रंथात सापडतात, असे प्रोफेसर मुरलीधर शर्मा यांनी सांगिकले आहे. Lord Hanuman born in Tirupati

    शर्मा हे टीटीडी आणि राष्ट्रीय संस्कृत विद्यापीठाने नियुक्त केलेल्या पंडित परिषदेचे अध्यक्ष आहेत. शर्मा म्हणाले की, हंपी येथील श्री हनुमान जन्मभूमी तीर्थ क्षेत्र विश्वस्तांचे संस्थापक श्री गोविंद सरस्वती स्वामी यांनी श्री अंजनेय यांचा जन्म हंपीजवळील पंपानदीच्या नदीच्या किनाऱ्यावर असलेल्या अंजनाहल्ली येथे झाल्याचा दावा केला होता. यासंदर्भात चर्चा करण्यासाठी त्यांना तिरुपतीचे निमंत्रण देण्यात आले. गोविंद सरस्वती स्वामी यांच्यासमवेत श्री कृपा विश्वरनाथ शर्मा यांनी तीन तास चर्चा केली.



    गोविंद स्वामी यांनी मांडलेल्या युक्तिवादाला आव्हान देण्यात आले. या वेळी टीटीडी समितीकडून पुराणातील संदर्भ देण्यात आले. तिरुमला तिरुपती देवस्थानच्या प्रयत्नांना स्वामींनी दुर्लक्ष करु नये, असेही आवाहन चर्चेच्या वेळी करण्यात आले. तीन तासाच्या प्रदीर्घ आणि सर्वंकष चर्चेनंतर कृपा शर्मा विश्वानाथ यांनी तिरुपतीसंदर्भातील दावे ठोस असल्याचे सांगितले. हंपी येथील स्वामी यांच्या युक्तिवादाला कोणताही आधार सिद्ध होऊ शकला नाही.

    Lord Hanuman born in Tirupati

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Mega Defence Boost : सैन्याला आत्मघाती ड्रोन, नवीन पिनाका रॉकेट, ड्रोन रडार मिळतील; ₹79 हजार कोटींच्या संरक्षण कराराला मंजुरी

    Bank Fraud : बँक फ्रॉडची रक्कम 30 टक्क्यांनी वाढून ₹21,515 कोटींवर; एप्रिल-सप्टेंबर दरम्यान प्रकरणे कमी, पण नुकसान वाढले

    Aravalli Case: अरवली खटली, सुप्रीम कोर्टाची आपल्याच आदेशाला स्थगिती; तज्ज्ञ समिती तपास करणार