• Download App
    विजय मल्याला लंडन न्यायालयाने ठरविले दिवाळखोर, भारतीय बॅँकांच्या बुडीत कर्ज वसुलीचा मार्ग मोकळा|London court rules Vijay Mallya bankrupt, paving way for recovery of bad loans of Indian banks

    विजय मल्याला लंडन न्यायालयाने ठरविले दिवाळखोर, भारतीय बॅँकांच्या बुडीत कर्ज वसुलीचा मार्ग मोकळा

    विशेष प्रतिनिधी

    लंडन : भारतातील विविध १७ बँकांचे ९००० कोटी रुपयांहून अधिक कर्ज बुडवून पळून गेलेल्या किंगफिशर कंपनीचा मालक विजय माल्या याला लंडन उच्च न्यायालयाने दिवाळखोर ठरवले आहे. स्टेट बॅँकेच्या नेतृत्वाखालील कर्न्सोटियमने याबाबतची याचिका दाखल केली होती. त्यामुळे भारतीय बॅँकांची बुडालेली कर्जे परत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.London court rules Vijay Mallya bankrupt, paving way for recovery of bad loans of Indian banks

    अनेक बँकांची फसवणूक करून विजय माल्या भारतातून फरार आहे. विजय मल्ल्या सध्या ब्रिटनमध्ये असून त्याच्या प्रत्यार्पणासाठीही भारताकडून प्रयत्न सुरु आहेत. लंडन उच्च न्यायालयाने विजय माल्याला दिवाळखोर म्हणून घोषित करून जबरदस्त झटका दिला आहे.



    याचबरोबर भारतीय स्टेट बँकेच्या नेतृत्वात भारतीय बँकांच्या कंसोर्टियमने माल्याची कंपनी किंगफिशर एअरलाइन्सला दिलेल्या कर्जाच्या वसूलीशी संबंधित खटला देखील जिंकला आहे. लंडन न्यायालयाच्या या निर्णयामुळे आता विजय माल्याची संपत्ती जप्त करण्याचे सर्व मार्ग मोकळे झाले आहेत.

    बँकांच्या कंसोर्टियमने लंडन न्यायालयाकडे मागणी केली होती की माल्याच्या किंगफिशर एअरलाइन्सला देण्यात आलेल्या कर्जाच्या वसूलीसाठी त्याला दिवाळखोर घोषित करावे. भारतीय बँकांच्या या याचिकेवर झालेल्या व्हर्चुअल सुनावणीत लंडन उच्च न्यायालयाने बँकांच्या बाजूने निकाल देते न्यायाधीश माइकल ब्रिग्स यांनी विजय माल्याला दिवाळखोर घोषित केलं जात असल्याचा निर्णय दिला.

    स्टेट बॅँक ऑफ इंडियाच्या नेतृत्वातील कंसोर्टियममध्ये बँक ऑ फ बडोदा, कॉपोर्रेशन बँक, फेडरल बँक लिमिटेड, आयडीबीआय बँक, इंडियन ओवरसीज बँक, जम्मू अ‍ॅण्ड़ काश्मीर बँक, पंजाब अ‍ॅण्ड सिंध बँक, पंजाब नॅशनल बँक, स्टेट बँक ऑफ मैसूर, यूको बँक, यूनाइटेड बँक ऑफ इंडिया आणि जेएम फायनानशीयल अ‍ॅसेट रिकंस्ट्रक्शन कंपनी प्रा. लि. आदींचा समावेश आहे.

    मद्यसम्राट विजय मल्याने प्रसारमाध्यमांमध्ये फसवणूक करणारा असा उल्लेख होत असल्याने नाराजी जाहीर केली होती. विजय मल्ल्याने ट्वीट करत म्हटलं होतं की, मी टीव्ही पाहत असून वारंवार माझा उल्लेख फसवणूक करणारा असा केला जात आहे.

    किंगफिशर एअरलाइनवर असलेल्या कर्जापेक्षा जास्त मालमत्ता ईडीने जप्त केली आह. तसेच अनेक वेळा मी १०० टक्के रक्कम परत करण्यासाठी आॅफर दिली आहे याचा कोणीच विचार करत नाही का? कुठे आहे फसवणूक?

    London court rules Vijay Mallya bankrupt, paving way for recovery of bad loans of Indian banks

    महत्त्वाच्या बातम्या

     

     

    Related posts

    RSS Chief Mohan Bhagwat : सरसंघचालक म्हणाले- भाजप-RSS मध्ये कोणताही वाद नाही; आम्ही सरकारसाठी निर्णय घेत नाही, फक्त सल्ला देतो

    PM SVANidhi : PM स्वनिधी योजनेची मुदत 31 मार्च 2030 पर्यंत वाढवली; कर्जाची रक्कमही ₹15,000 पर्यंत वाढली

    Supreme Court : केंद्राने म्हटले- राज्ये सुप्रीम कोर्टात रिट याचिका दाखल करू शकत नाहीत; राष्ट्रपती-राज्यपाल यांच्या निर्णयांसाठी न्यायालये जबाबदार नाही