विशेष प्रतिनिधी
ऑकलंड – कोरोना संसर्ग झालेला केवळ एक रुग्ण आढळल्यानंतर न्यूझीलंड सरकारने देशात लॉकडाऊन जाहीर केला आहे. गेल्या सहा महिन्यांमधील हा पहिलाच रुग्ण आहे. Lockdown in Newzeland due to corona
ऑकलंड शहरात हा रुग्ण आढळला असून या शहरात सात दिवस, तर उर्वरित देशामध्ये तीन दिवसांचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. न्यूझीलंडमध्ये लसीकरणाचे प्रमाण अत्यंत कमी असल्याने ही काळजी घेण्यात आली आहे. अशी वेळ कधीना कधी येणार, याची जाणीव असल्याने आधीपासूनच तयारी केली होती, असे पंतप्रधान जेसिंडा अर्डर्न यांनी सांगितले. योग्य वेळी आणि अत्यंत कडक नियमांचे पालन केल्याचा फायदा होतो, असेही त्यांनी सांगितले.
Lockdown in Newzeland due to corona
महत्वाच्या बातम्या
- ‘पेगॅसस’प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दिलासा, संवेदनशील माहिती देण्याची गरज नाही
- राष्ट्रीय महिला कॉँग्रेसच्या अध्यक्षपदी नेट्टा डिसूझा, सुस्मिता देव यांनी राजीनामा दिल्याने घाईघाईत नियुक्ती
- माजी वनमंत्री संजय राठोड अडचणीत, शरीरसुख मागितल्याचा आरोप करणाऱ्या महिलेचा जबाब नोंदविला
- उदयनराजे भोसले यांना कोरोनाची लागण, आईला भेटण्यासाठी आले होते अधिवेशन अर्ध्यावर सोडून