• Download App
    हरियानात कोरोनाची परिस्थीती आणखी गंभीर, राज्यात पुन्हा लॉकडाउन वाढवले Lockdown extended in Haryana

    हरियानात कोरोनाची परिस्थीती आणखी गंभीर, राज्यात पुन्हा लॉकडाउन वाढवले

    Lockdown extended in Haryana

    विशेष प्रतिनिधी

    चंदीगड – हरियाना सरकारने संपूर्ण राज्यात ३ मे ते नऊ मेपर्यंत एक आठवड्यासाठी संपूर्ण लॉकडाउन लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लॉकडाउन लागू केल्याचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी सांगितले. तत्पूर्वी हरियाना सरकारने शुक्रवारी रात्री दहा ते सोमवारी पहाटे पाच पर्यंत नऊ जिल्ह्यांत विकएंड लॉकडाउन लागू केला होता. Lockdown extended in Haryana

    हरियानात काल १३,३२२ नव्याने रुग्ण आढळून आले तर १४५ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच १०,४२२ रुग्ण बरे झाले आहे. संसर्ग पसरण्याचा दर ६.८९ टक्क्यांवर पोचला असून बरे होण्याचा दर घसरला आहे. तो ७८.६८ टक्क्यांवर पोचला आहे. राज्यातील १४४१ गंभीर रुग्णांपैकी १२३८ जण ऑक्सिजनवर आणि २०३ व्हेटिंलेटर सपोर्टवर आहेत. कोरोनाची गंभीर परिस्थिती पाहता लॉकडाउन लागू करण्याचा निर्णय घेतला.



    मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी म्हटले की, कोरोनाच्या विरोधात सर्वांनी एकत्र येऊन लढा द्यायला हवा. कोरोना संसर्गाचा सामना करण्यासाठी सरकार गंभीर असून परिस्थितीवर मात करत आपल्याला पुढे जायचे आहे.

    या लढाईत भीतीदायक वातावरण तयार करू नये आणि सकारात्मक भूमिका बजावावी, असे आवाहन त्यांनी केले. येत्या ९ मे पर्यंत संपूर्ण राज्यात लॉकडाउन लागू असेल, असे ते म्हणाले. दरम्यान, लॉकडाउन काळात काही क्षेत्रांना सवलत दिल्या आहेत.

    Lockdown extended in Haryana

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    दहशतवाद्यांसाठी पाकिस्तान आता उरला नाही “सुरक्षित स्वर्ग”, हेच Operation sindoor चे सर्वांत मोठे यश!!

    Modi – J. D. Vance चर्चेत nuclear या शब्दाचा उल्लेखही नाही, पाकिस्तानने आगाऊपणा केला, तर भारताचा प्रतिकार जास्त विध्वंसक!!

    Jitendra Singh : सीमावर्ती भागातील तांत्रिक अन् वैज्ञानिक प्रतिष्ठानांची सुरक्षा केंद्र वाढवणार