Sunday, 11 May 2025
  • Download App
    LJP अध्यक्ष चिराग पासवान यांच्या पक्षाला खिंडार, पक्षाच्या 5 खासदारांचे लोकसभा अध्यक्षांना पत्र । ljp mp being rebellion against lok janshakti party chief chirag paswan

    लोजपात बंडाळी : LJP अध्यक्ष चिराग पासवान यांच्या पक्षाला खिंडार, पक्षाच्या 5 खासदारांचे लोकसभा अध्यक्षांना पत्र

    ljp mp being rebellion against lok janshakti party chief chirag paswan

    lok janshakti party : लोक जनशक्ती पार्टीमध्ये फूट पडल्याची माहिती समोर आली आहे. अध्यक्ष चिराग पासवान यांच्या विरोधात बंडखोरी झाली आहे. राष्ट्रीय अध्यक्ष आणि खासदार चिराग पासवान यांच्याविरोधात पक्षाच्या 6 पैकी 5 खासदारांनी बंड केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार पशुपति पारस पासवान (काका), प्रिन्स राज (चुलत भाऊ), चंदन सिंग, वीणा देवी आणि मेहबूब अली केसर यांनी बंड केले. ljp mp being rebellion against lok janshakti party chief chirag paswan


    विशेष प्रतिनिधी

    पाटणा : लोक जनशक्ती पार्टीमध्ये फूट पडल्याची माहिती समोर आली आहे. अध्यक्ष चिराग पासवान यांच्या विरोधात बंडखोरी झाली आहे. राष्ट्रीय अध्यक्ष आणि खासदार चिराग पासवान यांच्याविरोधात पक्षाच्या 6 पैकी 5 खासदारांनी बंड केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार पशुपति पारस पासवान (काका), प्रिन्स राज (चुलत भाऊ), चंदन सिंग, वीणा देवी आणि मेहबूब अली केसर यांनी बंड केले.

    सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एलजेपीच्या पाच खासदारांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहून त्यांना एलजेपीपासून वेगळा पक्ष म्हणून मान्यता देण्याची विनंती केली आहे. लोकसभा अध्यक्ष आता कायद्यानुसार निर्णय घेतील. असे मानले जाते की हे पाचही जण जेडीयूशी संपर्कात आहेत. हे सर्व खासदार बिहार विधानसभा निवडणुकीच्या काळापासून असमाधानी होते. चिराग पासवान यांच्या कारभारामुळे ते दुखावले होते.

    विधानसभा निवडणुकीत एलजेपीने एकच जागा जिंकली होती आणि तो आमदारही नंतर जेडीयूमध्ये सामील झाला. आता एलजेपीकडे विधानसभा किंवा विधान परिषदेत कोणताही आमदार नाही. नुकतेच मोदी मंत्रिमंडळाच्या विस्ताराच्या कयासांमुळे संभाव्य मंत्री म्हणून चिराग यांचे नाव झेप घेऊ लागले. जेडीयूने चिराग यांच्या नावावर आक्षेप घेतला आहे. एनडीएच्या बैठकीत जेडीयूने आक्षेप घेतल्यानंतर चिराग यांना दिलेले आमंत्रण मागे घेण्यात आले.

    विधानसभा निवडणुकीत चिराग यांनी नितीश कुमारांवर कठोर हल्ला केला होता. जेडीयूला असे वाटते की, चिराग यांच्यामुळे अनेक जागांवर त्यांना फटका बसला. पाचही खासदार जेडीयूमध्ये दाखल झाले तर लोकसभेतील जेडीयूची संख्या वाढेल. नियमानुसार कोणत्याही राजकीय पक्षाच्या संसदीय पक्षातील दोन तृतीयांश खासदार वेगळा गट स्थापन करत असतील, तर ते पक्ष-बदलाच्या कक्षेत येत नाहीत. हे दोन तृतीयांश खासदार इतर कोणत्याही पक्षामध्ये विलीन होऊ शकतात. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला सोमवारी याचे परीक्षण करू शकतात.

    ljp mp being rebellion against lok janshakti party chief chirag paswan

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Operation Sindoor : ‘ऑपरेशन सिंदूर अजूनही सुरूच’, युद्धबंदी दरम्यान भारतीय हवाई दलाचे मोठे विधान

    Understand Geo politics : अमेरिकन प्रेसने पसरविले भारत विरोधी narrative; पण प्रत्यक्षात भारताचे पाकिस्तान वरले हल्ले अचूक आणि assertive!!

    PM Modi : ऑपरेशन सिंदूरबद्दल पी. चिदंबरम यांनी केले पंतप्रधान मोदींचे कौतुक