विशेष प्रतिनिधी
झारखंड : लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहणे हे आजकालचा एक नवीन ट्रेंड आहे. प्रत्येक जोडप्याला लग्नाआधी लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहून पाहायचं असतं. थोरामोठ्यांना याबद्दलचं मत विचारलं, तर काहीही उद्योग तरुण पिढीचे चालू असतात. असे म्हणून या नवीन ट्रेंडला झिडकारून देतील. पण तुम्हाला माहितीये का? झारखंडमधील एका गावामध्ये बऱ्याच आदिवासी जमातींमध्ये लिव्ह इन रिलेशनशिप ही बऱ्याच वर्षांपासून चालत आलेली एक प्रथा आहे. ह्या प्रथेला धुकू प्रथा असे म्हणतात.
‘Live in relationship’ is a tradition that has been going on for many years among many tribals in a village in Jharkhand
पण ही प्रथा कोणत्याही आधुनिक विचारातून सुरू झालेली नाहीये. तर आर्थिक कमतरता, त्रुटी यातून सुरू झालेली आहे. या आदिवासी जमातीतील लोकांकडे जेव्हा आयुष्य जगण्यासाठी कोणताही पर्याय शिल्लक नसतो, तेव्हा एकमेकांसोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहतात. पण जेव्हा ते लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहायला चालू करतात तेव्हा त्यांना बाकीच्या समाजातून बहिष्कृत केले जाते. अशा स्त्रियांना सिंदूर वापरण्याची देखील परवानगी नसते. या प्रथेला ‘धुकणी’ असे म्हणतात.
कायदेशीर रित्या कोणताही हक्क एकमेकांवर नसणार्या या पार्टनर्सना धुकुआ प्रॉपर्टी असेदेखील म्हणतात. या लिव्ह इन रिलेशनशिप मधून होणार्या मुलांना समाजामध्ये स्वीकारले जात नाही. कारण ते धुकु लग्नामधून जन्मले आहेत. म्हणून बऱ्याच सामाजिक कार्यकर्त्यांकडून अशा लग्नाला कायदेशीर परवानगी देण्याची धडपड सुरू आहे. कारण त्या लग्नातून होणार्या मुलांचे भवितव्य देखील बहिष्कृत वातावरणात जाणे हे त्यांच्या वाढीसाठी अजिबात चांगले नाही.
फेब्रुवारी 2021 मध्ये 105 अश्या जोडप्यांचे झारखंडमध्ये विवाह करण्यात आले आहेत. या विवाहामधून त्यांना भारतीय घटनेमध्ये लग्नाच्या नात्याला देण्यात आलेले सर्व कायदेशीर अधिकार देण्यात आलेले आहेत.
‘Live in relationship’ is a tradition that has been going on for many years among many tribals in a village in Jharkhand
महत्त्वाच्या बातम्या
- नवज्योत सिंग सिद्धूंचे पाकिस्तान प्रेम पुन्हा उफाळले, म्हणाले- इम्रान खान माझे मोठे भाऊ, मला खूप प्रेम दिले!
- हिंदी बिग बॉस मध्ये अभिजित बिचुकलेची होणार एन्ट्री
- कृषी कायदे रद्द घेतलेत, आता सीएए – एनआरसी हे कायदे मागे घ्या; मौलाना अर्षद मदानींची मोदींकडे मागणी
- “कामगारांचे निलंबन करूनही प्रश्न मिटत नसेल तर….” ; अतुल भातखळकर यांनी ठाकरे सरकारवर साधला निशाणा