• Download App
    सरसंघचालकांच्या पुस्तकाचे उर्दूत भाषांतर केल्याने पोटशूळ, निधीचा गैरवापर होत असल्याची साहित्यिकांची टीका | Literary criticism of Sarsanghchalak's book being translated into Urdu

    सरसंघचालकांच्या पुस्तकाचे उर्दूत भाषांतर केल्याने पोटशूळ, निधीचा गैरवापर होत असल्याची साहित्यिकांची टीका

    राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या पुस्तकाचे उर्दू भाषेत भाषांतर केल्याने तथाकथित लिबरल्सचा पोटशूळ उठला आहे. राष्ट्रीय उर्दू भाषा विकास परिषद (एनसीपीयूएल) निधीचा गैरवापर करत असल्याची तक्रार करण्यात आली आहे. Literary criticism of Sarsanghchalak’s book being translated into Urdu


    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या नव्या भारताचा वेध घेणाऱ्या पुस्तकाचे उर्दू भाषेत भाषांतर केल्याने तथाकथित लिबरल्सचा पोटशूळ उठला आहे. राष्ट्रीय उर्दू भाषा विकास परिषद (एनसीपीयूएल) निधीचा गैरवापर करत असल्याची तक्रार करण्यात आली आहे.

    सरसंघचालकांनी २०१८ मध्येनवी दिल्ली येथील विज्ञान भवनात तीन दिवसांची व्याख्यानमाला घेतली होती. त्यात त्यांनी केलेल्या भाषणांचा समावेश भविष्य का भारत या पुस्तकात आहे. या पुस्तकाचे उर्दूमध्ये भाषांतर करण्यात आले आहे. यासाठी राष्ट्रीय उर्दू भाषा विकास परिषदेने (एनसीपीयूएल) घेतलेल्या पुढाकाराबाबत उर्दू साहित्यिकांनी आक्षेप घेतला आहे. हा एनसीपीयूएलच्या निधीचा गैरवापर असल्याची टीकाही त्यांनी केली.



    भागवत यांनी लिहिलेल्या पुस्तकाचे अकिल अहमद यांनी उर्दूत भाषांतर केले आहे. अकिल हे एनसीपीयूएलचे संचालक आहेत. ही संस्था केंद्रीय शिक्षण मंडळाशी संलग्न आहे. या भाषांतरित पुस्तकाला मुस्तकबिल का भारत असे नाव देण्यात आले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संयुक्त महासचिव कृष्ण गोपाल आणि केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल यांच्या हस्ते ५ एप्रिलला या पुस्तकाचे प्रकाशन होईल.

    या पुस्तकाच्या भाषांतरापासून प्रकाशनापर्यंत एनसीपीयूएल घेत असलेल्या पुढाकाराबाबत उर्दू साहित्यिकांनी आक्षेप घेतले. कित्येक उर्दू साहित्यिक निधीअभावी साहित्य प्रकाशित करू शकत नाहीत. गरजू साहित्यिकांना मदत करण्यात राष्ट्रीय उर्दू भाषा विकास परिषदेकडून हात आखडता घेतला जातो. मग या पुस्तकाबाबत इतकी तत्परता का असा सवाल दिल्ली येथील उर्दू अकादमीचे माजी उपाध्यक्ष माजिद देऊबंदी यांनी केला आहे. पुस्तक एका विशिष्ट संस्थेच्या विचारसरणीचा पुरस्कार करते, असा आरोपही त्यांनी केला आहे.

    अकिल अहमद याबाबत म्हणाले, राष्ट्रीय उर्दू भाषा विकास परिषदेने याआधी भगवद्गीता, गुरुग्रंथ साहिब यांसारखे धार्मिक ग्रंथ उर्दूत भाषांतरित करून प्रकाशित केले आहेत. मुस्तकबिल का भारत हे पुस्तक म्हणजे नव्या भारताबाबत दिलेल्या व्याख्यानांचा संग्रह आहे. यात काहीही गैर नाही.

    Literary criticism of Sarsanghchalak’s book being translated into Urdu


     

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Acharya Pramod Krishnam : पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शहा यांनी मुर्शिदाबाद हिंसाचाराची दखल घ्यावी – आचार्य प्रमोद कृष्णम

    Mallikarjun Kharge : काँग्रेस संघटना मजबूत करणार, ‘संविधान वाचवा’ रॅलींसह देशभरात जनआंदोलन सुरू होणार

    Naresh Mhaske : उद्धव यांनी राज ठाकरेंना शिवसेना सोडण्यास भाग पाडले – नरेश म्हस्के