• Download App
    बोलण्यापेक्षा ऐकतानाच असते आपल्या मेंदूची क्षमता जास्त|Listening is more important than listening

    लाईफ स्किल्स : बोलण्यापेक्षा ऐकतानाच असते आपल्या मेंदूची क्षमता जास्त

    तज्ज्ञांच्या मते आज लक्षपूर्वक ऐकलेल्या भागापैकी साधारणत: पंचवीस टक्के भागच दोन महिन्यानंतर आपल्या लक्षात राहू शकतो. म्हणून लक्षपूर्वक ऐकण्याचं कौश्यल्य हे तत्कालीन समस्या-अडचणी समजून घेण्याकरिता उपयुक्त ठरते. विशिष्ट प्रकारच्या प्रक्षिणानं व्यक्तीच्या ऐकण्याच्या क्षमतेत वाढ करता येऊ शकते. सर्व सामान्य व्यक्ती साधारणत: १०० ते २०० शब्द मिनिटाला बोलत असते. पण ऐकण्याच्या क्षमतेत वाढ करता येऊ शकते. ऐकणाऱ्या मेंदू एवढयाच वेळात यापेक्षा जास्त शब्दावर प्रक्रिया शकतो. परिणामी ऐकणाऱ्या मेंदूकडे रिकामा कालावधी जास्त असतो.Listening is more important than listening

    या कालावधीत वेगळयाच विषयात रममाणं होणं. दिवास्वप्न पाहणं, कल्पनेचे मनोरे बांधणं अशा गोष्टी ऐकणारा करीत असतो. योग्य प्रशिक्षणाने ही वेळ बोलणाऱ्या उद्देश काय आहे. त्याला नेमकं काय मांडायचं आहे. यावर आपले विचार केंद्रीत करण्यासाठी वापरता येऊ शकतेः जेणेकरुन उत्तम संवाद साधता येतो. म्हणूनच लक्षपूर्वक ऐकण्यासाठी मनोनिग्रहाची नितांत गरज असते.

    कानावर काय येतं आहे इतपतच ते त्या मर्यादित नाही. संवाद साधताना बऱ्याचदासमोरच्याु व्यनक्तीतला काय सांगायचं आहे, हे ऐकून न घेता आपण आपलेच विचार त व्यक्तीवर कळत–नकळतपणे लादण्याचा प्रयत्न करीत असतो. परिणामी संवाद साधण्यात अडथळा उदभतो व संवाद पूर्ण होत नाही. योग्य आणि दूरगामी सकारात्मक परिणामकारक निर्णय घेण्यासाठी लक्षपूर्वक ऐकण्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे.

    जे लोक शांतपणे ऐकून घेतात व कमी बोलतात त्यांचे त्यांच्या कामावर जास्त लक्ष केंद्रीत झालेले पहायला मिळते. इतरांच्या तुलनेत ते अधिक शांत व संयमी असतात. त्याचा त्यांना सर्वच आयुष्यात फायदा झाल्याशिवाय रहात नाही. त्यामुळे नेहमी ऐकायला महत्व द्या. बघा तुमच्या जीवनात कशा सकारात्मक बदल होतो ते. कारण ऐकण्याने जे मानसिक स्वास्थ मिळते ते अन्य कोणत्याही बाबीतून मिळत नाही हे लक्षात ठेवा.

    Listening is more important than listening

     

    Related posts

    Karnataka : कर्नाटकच्या माजी डीजीपीच्या हत्येप्रकरणी पत्नीला अटक

    Rahul Gandhi : कर्नाटकनंतर राहुल गांधी यांचे हिमाचल-तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना पत्र

    रोजगाराच्या संधी वाढल्या, EPFOने फेब्रुवारीमध्ये १६.१ लाख सदस्य जोडले