वृत्तसंस्था
जम्मू : उत्तर प्रदेशाला यंदाच्या विधानसभा निवडणुकीत भाजपापासून मुक्ती देणे ही 1947 च्या स्वातंत्र्यापेक्षा मोठी घटना असेल, असा दावा जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीडीपीच्या नेते मेहबूबा मुफ्ती यांनी केला आहे. Liberation of Uttar Pradesh from BJP is a bigger event than the independence of 1947; Claim of Mehbooba Mufti
पीडीपीच्या एका मेळाव्यात त्या बोलत होत्या. उत्तर प्रदेशात निवडणुका आल्यामुळे भाजप औरंगजेब, बाबर अशा सुलतानांची आठवण काढत आहे. त्यांना देशाचे ऐक्य टिकवायाचे नाही. त्यामुळेच ते हिंदू-मुस्लीम वाद निर्माण करून निवडणूक जिंकू इच्छितात. पण आधीच्या निवडणुकीत त्यांची योजना सफल झाली असली तरी 2022 च्या निवडणुकीत ते सफल होतीलच असे नाही, असा दावाही मेहबूबा मुफ्ती यांनी केला.
उत्तर प्रदेशाच्या निवडणुकीत भाजपचा पराभव करणे म्हणजेच उत्तर प्रदेशाला भाजपपासून मुक्ती देणे ही घटना 1947 मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळण्याच्या घटनेपेक्षा मोठी असेल, अशी टिपणी ही मेहबूबा मुफ्ती यांनी केली. मेहबूबा मूफ्ती यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात मोठा वाद निर्माण झाला आहे.