विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : देशात सध्या सुरू असलेल्या राहुल गांधी एपिसोड मध्ये वेगवेगळ्या कड्या जोडल्या जात आहेत. त्यातच सध्या मोदी सरकारचा मनाच्या तळापासून विरोध करत असलेल्या लिबरल्स आणि पत्रकारांनी राहुल गांधींची तळी उचलायला पुन्हा एकदा सुरुवात केली आहे. राहुल गांधींचे लोकसभेचे सदस्यत्व रद्द झाले. त्यांच्या समर्थनासाठी काँग्रेसचे मुख्यमंत्री, आमदार, खासदार या सर्वांनी राजीनामे देऊन जनतेच्या दरबारात जावे, असा सल्ला अनेक लिबरल्स आणि पत्रकारांनी दिला आहे. Liberals and journalists suggested all Congress chief ministers, MPs, MLAs should resign in support of rahul Gandhi, but why Congressmen didn’t follow that??
राहुल गांधी यांनी आज दुपारी 1.00 वाजता पत्रकार परिषद घेतली. त्यापूर्वी राहुल गांधी काय बोलणार आणि काँग्रेसचे आमदार खासदार त्यांच्या समर्थनासाठी राजीनामा देणार का??, याची चर्चा राजकीय वर्तुळात आणि सोशल मीडियात सुरू होती.
पण राहुल गांधींचे 1.00 वाजताची पत्रकार परिषद झाली. त्यांनी गौतम अदानी आणि नरेंद्र मोदी यांच्या संबंधांबाबत टीकास्त्र सोडले. गौतम अदानींच्या शेल कंपनीत 20000 कोटी रुपये कुठून आले??, असा सवाल केला. पण स्वतःच्या समर्थनासाठी काँग्रेसच्या एकाही आमदार, खासदाराच्या अथवा मुख्यमंत्र्याच्या राजीनाम्याची घोषणा केली नाही.
सीएए – एनआरसी विरोधातील शाहीन बागी आंदोलन, त्यानंतर झालेले कृषी कायद्यांच्या विरोधातले आंदोलन इथपासून सगळे लिबरल्स आणि पत्रकार राहुल गांधींच्या पाठीशी ठामपणे उभे असताना त्यांनी जो काँग्रेस आमदार, खासदार आणि मुख्यमंत्र्यांना सल्ला दिला, तो सल्ला अजून कोणी मानला कसा नाही?? त्या सल्ल्यानुसार काँग्रेसच्या आमदार, खासदारांनी अथवा मुख्यमंत्र्यांनी राजीनामे कसे दिले नाहीत??, हा प्रश्न आहे.
पण काँग्रेसच्या राजकीय डीएनए मध्येच त्याचे खरे उत्तर दडले आहे. वर्षानुवर्षे सत्ता भोगलेला काँग्रेस हा पक्ष आहे. सत्ता कशी राबवायची, सत्ता कशी वागवायची हे कळणारे काँग्रेस नेते अद्यापही वरिष्ठ पदांवर शिल्लक आहेत. सत्तेची धुंदी आणि मस्ती काँग्रेसला नवीन नाही. राहुल गांधींच्या समर्थनासाठी काँग्रेस नेते आणि कार्यकर्ते भले रस्त्यावर उतरून आंदोलन करत असतील. भविष्यातही ते आंदोलन करतील पण हाती असलेली सत्ता कुठलाही काँग्रेसचा नेता तर सोडाच, पण काँग्रेसचा सर्वसामान्य कार्यकर्ताही सोडायला तयार होत नाही. हा काँग्रेसचा इतिहास, वर्तमान आणि काँग्रेसचे भविष्य आहे!!
त्यामुळे मोदींच्या विरोधात लिबरल्स आणि पत्रकार यांचा मोदी विरोध कितीही तीव्र असला आणि त्या तीव्रतेतून त्यांनी राहुल गांधींच्या पाठीशी उभे राहताना त्यांच्या समर्थनासाठी काँग्रेसच्या आमदार, खासदार आणि मुख्यमंत्र्यांना राजीनामा देण्याचा सल्ला दिला असला, तरी काँग्रेसचे नेते हे लिबरल्स आणि पत्रकारांच्या नादी लागून राजीनामा देण्याइतके दुधखुळे नाहीत, हे काँग्रेसचे राजकीय सत्य आहे!! त्यामुळेच अद्याप काँग्रेसच्या कुठल्याही नेत्याने राजीनामा दिल्याची कृती केलेली नाही ही वस्तुस्थिती आहे.
काँग्रेसची सध्या राजस्थान छत्तीसगड आणि हिमाचल प्रदेशात सत्ता आहे तिथल्या हजारो कोटींच्या बजेटवर तिथल्या मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे. तो अधिकार सोडून देणे कुठल्याही मुख्यमंत्र्याला शक्य नाही. विशेषत: निवडणुकीच्या वर्षात काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याला तर अजिबात परवडणार नाही.
पण या मुद्द्यात आणखी एक बारकावा देखील दडला आहे, तो म्हणजे काँग्रेसच्या आमदार, खासदार आणि मुख्यमंत्र्यांना राजीनाम्याचा सल्ला देणारे पत्रकार यांची पार्श्वभूमी सातत्याने फाटाफूट पडणाऱ्या जुन्या समाजवाद्यांची आहे. समाजवाद्यांना या देशात कधी सत्ता मिळवता आली नाही आणि त्यांनी ती टिकवण्याचा प्रश्नच नव्हता. पण सत्ता तर सोडाच, त्यांना स्वतःचे जुने समाजवादी पक्ष देखील कधी एकसंघ टिकवता आले नाहीत. त्यामुळे तसल्या समाजवादी पार्श्वभूमी असलेल्या लिबरल्स आणि पत्रकारांचा सल्ला सत्तेची पाळेमुळे घट्ट असणाऱ्या काँग्रेस नेत्यांनी मानणे हीच मुळी राजकीय बेवकूफी मानली जाईल आणि ती बेवफुकी काँग्रेसचे नेते कधीही करणार नाहीत. कारण त्यांचा तो इतिहास नाही!!
Liberals and journalists suggested all Congress chief ministers, MPs, MLAs should resign in support of rahul Gandhi, but why Congressmen didn’t follow that??
महत्वाच्या बातम्या
- कर्नाटक सरकारचा मोठा निर्णय : मुस्लिमांचे आरक्षण रद्द करून या दोन समाजांना दिला ‘फायदा’
- केंद्र सरकारकडून सरकारी कर्मचाऱ्यांना खुशखबर, चार टक्के DA वाढवला
- बच्चू कडूंना दोन वर्षांची शिक्षा तरी आमदारकी होणार नाही रद्द; सोशल मीडियावर चर्चा, पण कारण काय??
- राहुल गांधींची खासदारकी रद्द झाल्यानंतर काँग्रेसचा मोठा बवाल; पण गेल्या 10 वर्षांत बाकीच्या पक्षांच्याही 11 आमदार, खासदारांचे सदस्यत्व रद्द!!