• Download App
    एलईडी बल्ब फक्त १० रुपयांत, केंद्राची ग्राम उजाला योजना; एका दिवसात १० लाख बल्बचे वाटप|LED bulbs for only Rs. 10, Centre's Gram Ujala Yojana; Distribution of 1 million bulbs in one day

    एलईडी बल्ब फक्त १० रुपयांत, केंद्राची ग्राम उजाला योजना; एका दिवसात १० लाख बल्बचे वाटप

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या ग्राम उजाला योजनेअंतर्गत फक्त १० रुपयात एलईडी बल्ब देण्यात येत असून गेल्या वर्षी एका दिवसांत १० लाख बल्बचे वाटप करण्यात आले आहे. ग्राम उजाला योजना बिहार, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि तेलंगणातील ग्रामीण भागांमध्ये राबविण्यात येत आहे.LED bulbs for only Rs. 10, Centre’s Gram Ujala Yojana; Distribution of 1 million bulbs in one day

    सरकारी कंपनी कन्व्हर्जन्स एनर्जी सर्व्हिसेस लिमिटेडकडून (CESL) ग्राम उजाला योजनेंतर्गत ५० लाख एलईडी बल्ब वितरीत करण्याची महत्त्वपूर्ण कामगिरी योजने अंतर्गत केली आहे.



    सीईएसएलने गेल्या वर्षी मार्चमध्ये खेड्यापाड्यात १० रुपयांच्या किमतीत एलईडी बल्ब देण्याची योजना सुरू केली. डिसेंबरमध्ये राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिन, २०२१ च्या निमित्ताने एकाच दिवसात १० लाख एलईडी बल्ब वितरित केले.

    तीन वर्षांच्या हमीसह 7W आणि 12W एलईडी बल्ब कंपनीकडून दिले जात आहेत. या कार्यक्रमांतर्गत प्रत्येक कुटुंबाला जास्तीत जास्त ५ बल्ब मिळू शकतात. वीज बचतीसह प्रखर प्रकाश असा दुहेरीसंगम साधण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.

    LED bulbs for only Rs. 10, Centre’s Gram Ujala Yojana; Distribution of 1 million bulbs in one day

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    TMC : साड्यांच्या ढिगाऱ्याखाली लपला TMC नेता! ‘कट मनी’ घोटाळ्याच्या आरोपांनंतर नाट्यमय कारवाई, व्हिडिओ व्हायरल

    Akhilesh Yadav : राम मंदिरातील देणग्यांमध्ये गैरव्यवहार? अखिलेश यादव यांचा गंभीर आरोप; ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी दिले प्रत्युत्तर

    काँग्रेसची तामिळनाडूत जोसेफ विजयच्या TVK पक्षाच्या सत्तेत शिरकत; पण INDI आघाडीच्या बैठकीत काँग्रेसने काढली त्या पक्षाची इज्जत!!