• Download App
    पक्षीय राजकारण सोडा, अमरावती शांत करा; नवनीत राणा यांचा संजय राऊत, यशोमती ठाकूर यांना इशारा Leave partisan politics calm Amravati

    पक्षीय राजकारण सोडा, अमरावती शांत करा; नवनीत राणा यांचा संजय राऊत, यशोमती ठाकूर यांना इशारा

    प्रतिनिधी

    अमरावती : त्रिपुरातील कथित हिंसाचाराच्या विरोधात रझा अकादमीने अमरावतीत मोर्चा काढल्यानंतर आज त्याची प्रतिक्रिया उमटली आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांनी अमरावती बंद पुकारला आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजप दंगली घडवून महाराष्ट्रात कायदा व सुव्यवस्था प्रश्न निर्माण करत आहे. भाजपला महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट आणायची आहे, असा आरोप केला आहे. अशाच आशयाचे विधान अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी केले आहे.Leave partisan politics calm Amravati

    या पार्श्वभूमीवर अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी शांततेचे आवाहन केले आहे. त्याच वेळी त्यांनी संजय राऊत आणि यशोमती ठाकूर यांना राजकारण सोडून द्यायचे आणि अमरावतीकरांना शांत करायचे आवाहन केले आहे. ही वेळ कोणतेही धर्माचे, पक्षाचे राजकारण करायची नाही. पक्षीय राजकारण सोडून संजय राऊत, पालकमंत्र्यांनी जपून वक्तव्ये केली पाहिजेत. अमरावतीकरांना शांत केले पाहिजे. दोन्ही बाजूंना समजावून सांगितले पाहिजे, असे आवाहन केले आहे.

    काल अमरावतीत झालेल्या मोर्चातील दगडफेकीचा निषेध जरूर केला पाहिजे पण तो शांततेच्या मार्गाने असावा असे आवाहन देखील नवनीत राणा यांनी केले आहे
    याबाबत त्यांनी एक व्हिडिओ जारी करून अमरावतीकरांना देखील शांतता राखण्याचे आवाहन केले आहे.

    Leave partisan politics calm Amravati

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!