विशेष प्रतिनिधी
पणजी : गोव्यातील भाजपचे बंडखोर नेते लक्ष्मीकांत पर्सेकर यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढविण्याचे ठरविले असून भाजपचा राजीनामा दिल्यानंतर अनेक राजकीय पक्षांनी संपर्क केल्याचा दावा केला आहे. laxmikant parsekar will fight independently it also claims to be in contact with several parties
भाजपने ३४ जागांसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. त्यात त्यांचे नाव नव्हते. त्यामुळे त्यांनी बंडखोरी करून अपक्ष म्हणून निवडणुकीत उतरण्याचा निर्णय घेतला आहे.
ते म्हणाले की, कार्यकर्त्यांकडे चर्चा केल्यानंतर मी सध्या तरी अपक्ष म्हणूनच पुढे जायचा निर्णय घेतला आहे. एका पक्षाचा शेला उतरवून ठेवल्यानंतर अन्य पक्षांनी माझ्याशी संपर्क केला; परंतु मला अपक्ष म्हणूनच रिंगणात उतरायचे आहे. माझ्या मागे जनमत आहे की नाही किंवा मी किती पाण्यात आहे, हे मलाही पाहायचे आहे. कारण २०१७ मध्ये माझा पराभव झाला, तेव्हा काही स्वकीय माझे जनमत गेले असे म्हणू लागले, परंतु वस्तुस्थिती तशी नाही.
‘मांद्रे मतदारसंघात ३३५ मतांपासून मी पक्ष मोठा केला, परंतु गेल्या पाच वर्षांत जे काही मी पाहिले ते अनपेक्षित होते. मंडल, बूथ समित्यांवर जुन्या, तसेच मूळ कार्यकर्त्यांना डावलले. कार्यकर्त्यांच्या मनात खदखद होती. मी पक्ष सोडल्यानंतर अनेक पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी राजीनामे अध्यक्षांकडे पाठवून दिले. मला पक्षाने गृहीत धरले. तिकीट नाही दिले तरी मी कुठेही जाणार नाही, असे पक्ष नेत्यांना वाटले होते. परंतु, त्यांचा अंदाज चुकला, असे पार्सेकर म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, गेली ३० वर्षे हा पक्ष मी वाढविला आणि मोठ्या जड अंतःकरणाने मला पक्ष सोडावा लागला. पक्षाच्या भरवंशावर राहिलो. मला तिकीट मिळेल याची खात्री होती. परंतु, मला डावलण्यात आले आणि जे बेभरवंशाचे होते त्यांना पक्षाने उमेदवारी दिली, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
laxmikant parsekar will fight independently it also claims to be in contact with several parties
महत्त्वाच्या बातम्या
- सरकारच्या चांगल्या कामांविषयी कमी लिहितो म्हणून पत्रकारावर गुन्हा दाखल
- हिंदूंवर द्वेषपूर्ण भाषणांसाठी गुन्हे दाखल करता तर मुस्लिमांवरही करा, सर्वोच्च न्यायालया याचिका दाखल
- स्वातंत्र्यानंतर अनेक स्वातंत्र्ययोध्यांचे योगदान पुसून टाकण्याचा प्रयत्न, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा कॉँग्रेसवर हल्लाबोल
- ठाकरे सरकारच्या राज्यात मुघल कबरीतून पुन्हा अवतरलेत, अतुल भातखळकर यांची टीका