• Download App
    भारतातल्या पहिल्या कोरोना प्रतिबंधक नेझल लसीचे २६ जानेवारीला लॉंचिंग; किती असणार किंमत?Launch of India's first anti-corona nasal vaccine on January 26; How much will the price be?

    भारतातल्या पहिल्या कोरोना प्रतिबंधक नेझल लसीचे २६ जानेवारीला लॉंचिंग; किती असणार किंमत?

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनी म्हणजेच 26 जानेवारी 2023 ला देशातील पहिली कोरोना प्रतिबंधक नेझल लस लॉंच करण्यात येणार आहे. सध्या उपलब्ध असलेल्या कोरोना लसीचा डोस हा इंजेक्शनद्वारे घेतला जात आहे. परंतु आता भारत बायोटेकने देशात निर्माण केलेली नेझल लस ही नाकावाटे घ्यायची आहे. Launch of India’s first anti-corona nasal vaccine on January 26; How much will the price be?

    म्युकोसात रोगप्रतिकारशक्ती निर्माण करणारी नेझल लस 

    कोरोनाचे इंजेक्शन घेण्याची गरज भासू नसे यासाठी या नाकावाटे दिल्या जाणाऱ्या लसीची निर्मिती करण्यात आली. भारत बायोटेकच्या या नेझल व्हॅक्सिनसाठी २३ डिसेंबरला केंद्र सरकारने परवानगी दिली होती. नाकावाटे घ्यायची ही लस बुस्टर डोस म्हणून घेता येणार आहे. सुरूवातीच्या काही दिवसांमध्ये ही लस खासगी रुग्णालयात मिळणार आहे. नाकातील म्युकोसाद्वारे कोरोना आणि व्हायरल इन्फेक्शन होते. नेझल व्हॅक्सिन थेट म्युकोसात रोगप्रतिकारशक्ती निर्माण करते. नेझल व्हॅक्सिन लसीकरणाची परवानगी केवळ १८ वर्षांवरील नागरिकांना आहे.

    Vaccination : ५-१५ वर्षांच्या बालकांच्या लसीकरणाबाबत आरोग्यमंत्र्यांचे मोठे वक्तव्य, म्हणाले- तज्ज्ञांच्या शिफारशीनुसार निर्णय घेणार

    भारत बायोटेकला या महिन्याच्या सुरुवातीला सेंट्रस ड्रग्ज स्टॅंडर्ड ऑर्गनायझेशनकडून देशात अनुनासिक लस विकण्याची मान्यता मिळाली. ही लस CoWIN वर सुद्धा उपलब्ध आहे. हा डोस थेट श्वासोच्छवासाच्या मार्गांमध्ये पोहोचवणे हे उद्दिष्ट आहे. दरम्यान, भारताच्या वॅक्सिन टास्क फोर्सचे प्रमुखांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्यांनी बूस्टर डोस घेतला नसेल त्यांना नेझल व्हॅक्सिन घेता येणार आहे.

    किंमत किती असणार?

    भारत बायोटेकने घोषणा केल्याप्रमाणे सरकारी रुग्णालयांमध्ये प्रति डोस ३२५ रुपये आणि खासगी लसीकरण केंद्रांना हा डोस ८०० रुपये प्रति या दराने विकला जाणार आहे.

    Launch of India’s first anti-corona nasal vaccine on January 26; How much will the price be?

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    कसलं ceasefire??, अवघ्या 4 तासांत पाकिस्तान कडून विश्वासघात, शस्त्रसंधीचे उल्लंघन, जम्मूतल्या गोळीबारात BSF जवान शहीद!!

    Char Dham Yatra : उत्तराखंड सरकारचा मोठा निर्णय, चारधाम यात्रेसाठी हेलिकॉप्टर सेवा पुढील आदेशापर्यंत बंद

    पाकिस्तानच्या विनंतीनंतरच भारताने सध्या थांबविले firing; सिंधू जल करार राहणार स्थगितच, त्यात नाही बदल!!