Assam Election Result LIVE : कोरोना संकटादरम्यान ज्या पाच राज्यांमध्ये निवडणुका घेण्यात आल्या, त्यामध्ये ईशान्येकडील आसामचादेखील समावेश होता. आसाम विधानसभा निवडणुकीचे निकाल आज जाहीर होत आहेत. पाच वर्षे सत्तेवर असलेल्या भारतीय जनता पक्षासमोर सत्ता राखण्याचे आव्हान आहे, तर कॉंग्रेसने सत्तेत परत येण्यासाठी पूर्ण ताकद लावली आहे. Latest Updates Assam election results live Now bjp is Leading More than congress
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : कोरोना संकटादरम्यान ज्या पाच राज्यांमध्ये निवडणुका घेण्यात आल्या, त्यामध्ये ईशान्येकडील आसामचादेखील समावेश होता. आसाम विधानसभा निवडणुकीचे निकाल आज जाहीर होत आहेत. पाच वर्षे सत्तेवर असलेल्या भारतीय जनता पक्षासमोर सत्ता राखण्याचे आव्हान आहे, तर कॉंग्रेसने सत्तेत परत येण्यासाठी पूर्ण ताकद लावली आहे.
आसाममध्ये विविध वृत्तवाहिन्यांवरील आकडेवारीनुसार सध्या भाजप प्रणीत एनडीए 50 जागांवर पुढे असून काँग्रेस प्रणीत यूपीए 24 जागांवर पुढे आहे. प्राथमिक कलानुसार भाजपचे पारडे जड दिसत आहे. तथापि, दुपारी बारा वाजेदरम्यान चित्र अधिक स्पष्ट होण्याचा अंदाज आहे.
निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावरील सकाळी 9.48 वाजेपर्यंतचे अपडेट्स
Assam Result Status |
|||
Status Known For 18 out of 126 Constituencies
|
|||
Party | Won | Leading | Total |
---|---|---|---|
Asom Gana Parishad | 0 | 4 | 4 |
Bharatiya Janata Party | 0 | 9 | 9 |
Bodoland Peoples Front | 0 | 1 | 1 |
Indian National Congress | 0 | 2 | 2 |
United People’s Party, Liberal | 0 | 2 | 2 |
Total | 0 | 18 | 18 |
तत्पूर्वी सकाळी सात वाजता आसाममधील मतमोजणीची तयारी पूर्ण झाली. केंद्रांवर येण्यापूर्वी सर्वांचे तापमान मोजून कोरोना मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्यात आले. आसाममध्ये यावेळी एकूण तीन टप्प्यांत मतदान झाले. राज्यातील एकूण 126 विधानसभा जागांवर 82.04 टक्के मतदान झाले. राज्यात एक किंवा दोन ठिकाणी ईव्हीएमबाबत गोंधळ उडाला असला, तरी हिंसाचाराची कोणतीही घटना घडली नाही.
आसाममध्ये यावेळी भाजपने मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्यावर निवडणूक लढविली नाही. सर्बानंद सोनोवाल सध्या भाजपचे मुख्यमंत्री आहेत, परंतु यावेळी भाजपने मुख्यमंत्रिपदासाठी कोणताही चेहरा ठरवलेला नाही. सर्बानंद सोनोवाल आणि हेमंत बिस्वा शर्मा यांची जोडी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावावर भाजपने निवडणूक लढविली.
नागरिकत्व दुरुस्ती कायदा आणि नागरिकांसाठी राष्ट्रीय नोंदणी हे आसाममध्ये मोठे मुद्दे राहिलेले आहेत. कॉंग्रेसने आश्वासन दिले की सीएए आणणार नाही, त्याच वेळी भाजपने या विषयावर कमी भाष्य केले. आसाममध्ये यावेळी भाजप आसाम गण परिषद, यूपीपीएल, जीएसपीशी युती करणार आहे, तर एआययूडीएफ, बीपीएफ, माकप, भाकप, सीपीआय (एमएल) यासारखे पक्ष कॉंग्रेससोबत आहेत.
Latest Updates Assam election results live Now bjp is Leading More than congress
महत्त्वाच्या बातम्या
- West Bengal Assembly Election 2021 Results Live : बंगालमधील या उमेदवारांकडे व मतदारसंघांकडे जरूर द्या लक्ष… तिथे आहेत लक्षवेधी लढती
- West bengal assembly elections 2021 results updates : ममता बॅनर्जी नंदीग्राममध्ये पिछाडीवर, सुवेंदू अधिकारी आघाडीवर
- Belgaum Bypoll Result : कोण मारणार बाजी ? मंगला अंगडी, सतीश जारकीहोळी की शुभम शेळके
- Kerala Assembly Election 2021 Results Live : केरळच्या निवडणुकीवर अतिशय प्रभाव टाकणारे ‘हे’ आहेत मुद्दे…