• Download App
    मोदी – शहांची काल रात्री बंगालबाबत आढावा बैठक झाली; त्यांना समजून चुकलंय बंगालमध्ये तृणमूळ जिंकतेय; डेरेक ओब्रायन यांची “गोपनीय माहिती”|Last night, Modi-Shah, had a review meeting over Bengal. They know that we're ahead of them, 'Tourist Gang', despite big talks, are behind, that's why the mind games

    मोदी – शहांची काल रात्री बंगालबाबत आढावा बैठक झाली; त्यांना समजून चुकलंय बंगालमध्ये तृणमूळ जिंकतेय; डेरेक ओब्रायन यांची “गोपनीय माहिती”

    वृत्तसंस्था

    कोलकाता : पश्चिम बंगालच्या राजकीय स्थितीबाबत अतिशय गोपनीय माहिती तृणमूळ काँग्रेसचे नेते डेरेक ओब्रायन यांनी आज पत्रकारांना दिली. ते म्हणाले, की काल रात्री पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांची बंगालच्या निवडणूकीबाबत आढावा बैठक झाली.Last night, Modi-Shah, had a review meeting over Bengal. They know that we’re ahead of them, ‘Tourist Gang’, despite big talks, are behind, that’s why the mind games

    यात त्यांना समजून चुकलेय की बंगालमध्ये तृणमूळ काँग्रेस जिंकते आहे. लोकसभा निवडणूकीत तृणमूळ काँग्रेसला भाजपपेक्षा ३ टक्के मते जास्त होती. या विधानसभा निवडणूकीत तृणमूळला भाजपपेक्षा ६ टक्के मते जास्त पडणार आहेत.



    ही मोदी – शहांच्या टुरिस्ट गँगची रणनीती आहे, की भाजप हरतोय असे दिसल्यावर त्यांनी मोठमोठ्या बाता मारायला सुरूवात केली आहे. ममता बॅनर्जी नंदीग्राममधून जिंकणार आहेत. पण त्या हरताहेत असे सांगून त्या दुसऱा मतदारसंघ शोधत असल्याची अफवा भाजपवाले फैलावत आहेत,

    असा दावाही डेरेक ओब्रायन यांनी केला. भाजपचे नेते माइंड गेम खेळून तृणमूळला हरविण्याचा प्रयत्न करत आहेत पण त्यात ते यशस्वी होणार नाहीत, असेही ते म्हणाले.

    डेरेक ओब्रायन यांना तृणमूळ काँग्रेसचे ज्येष्ठ नेते यशवंत सिन्हा यांनी देखील साथ दिली. ते म्हणाले की कालपासून भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा एक अफवा फैलावत आहेत, की ममता बॅनर्जी या दुसऱ्या मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत.

    पण प्रत्यक्षात तसे काहीही नाही. ममता बॅनर्जी नंदीग्राममधून जिंकतील. हा भाजपवाल्यांचा जूना माइंडगेम आहे. मला तो चांगलाच माहिती आहे. आणि त्यावर मात करायला तृणमूळ काँग्रेसचे नेते सक्षम आहेत.

    इव्हीएमवर आमचे पुरते लक्ष आहे. त्यांच्या वाहतूकीच्या वेळी त्यांची अदलाबदल होणार नाही, याची आम्ही पुरती काळजी घेऊ, असे सिन्हा यांनी सांगितले.

    Last night, Modi-Shah, had a review meeting over Bengal. They know that we’re ahead of them, ‘Tourist Gang’, despite big talks, are behind, that’s why the mind games

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य