नववी आणि अकरावीचा निकाल खूपच खराब लागला आहे; ९६ टक्क्यांहून अधिक विद्यार्थी नापास झाल्याची स्थिती आहे.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : राजधानी दिल्लीतील सरकारी शाळांमध्ये शिकणाऱ्या इयत्ता नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांच्या मुख्य परीक्षा संपल्या आहेत. या विद्यार्थ्यांचा निकालही ३१ मार्च रोजी जाहीर झाला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यावेळी मोठ्या प्रमाणात विद्यार्थी नापास झाले आहेत, त्यामुळे शिक्षण विभागात खळबळ उडाली आहे. शिक्षण संचालनालयाच्या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांचे गुण सुधारण्यासाठी शिक्षण संचालनालयाने या शाळांना ६ एप्रिलपर्यंत मुदत दिली आहे. असे वृत्त दैनिक जागरणने दिले आहे. Large number of students fail Class IX and XI exams in Delhi government school teachers have to write answer sheets
दिल्लीच्या बाहेरील भागातील एका सरकारी शाळेतील शिक्षकाने सांगितले की, शाळांचा नववी आणि अकरावीचा निकाल खूपच खराब लागला आहे. ९६ टक्क्यांहून अधिक विद्यार्थी नापास झाल्याची स्थिती आहे. ६० मुलांच्या वर्गात फक्त चार ते पाच मुले उत्तीर्ण होतात. एवढ्या मोठ्या संख्येने अनुत्तीर्ण विद्यार्थी पाहून प्राचार्यही आश्चर्यचकित झाले आहेत. आता शिक्षण संचालनालयाकडून निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांचे गुण सुधारण्यासाठी मुदत देण्यात आली आहे. बहुतेक विद्यार्थ्यांना ८० पैकी १० गुणही पार करता आले नाहीत.
शिक्षकांचा आरोप आहे की मुख्याध्यापकांकडून आपल्या शाळेचा इयत्ता नववी आणि अकरावीचा खराब निकाल शिक्षण विभागाच्य् नजरेत येऊ नये आणि खराब निकालामुळे कोणी जाब विचारू नये, यासाठी शिक्षकांवर विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका लिहून त्या पुन्हा तपासण्यासाठी आणि त्यांना पास करण्यासाठी दबाव आणला जात आहे.
नवी दिल्लीतील एका सरकारी शाळेतील शिक्षकाने सांगितले की, त्याच्या वर्गातील बहुतेक विद्यार्थी इंग्रजी विषयात आठ ते दहा गुणांनी नापास होतात. अनेक विद्यार्थ्यांनी उत्तरपत्रिका कोरीच ठेवली आहे. तर अनेक विद्यार्थ्यांनी चुकीची उत्तरे लिहिली आहेत. ८० गुणांच्या परीक्षेत विद्यार्थ्यांना १२ ते १५ गुण मिळाले आहेत. आता शिक्षण संचालनालयाने विद्यार्थ्यांना गुण सुधारण्यासाठी वेळ दिला असताना, अधिकाधिक विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्यासाठी मुख्याध्यापक दबाव टाकत आहेत.
आता नापास झालेल्या मुलांना उत्तीर्ण करून त्यांचे निकाल पुन्हा शिक्षण संचालनालयाच्या संकेतस्थळावर अपडेट करणार असल्याचे त्यांनी सांगितले. पूर्व दिल्लीतील एका सरकारी शाळेतील शिक्षकाने सांगितले की, जेव्हा त्यांनी इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका तपासल्या तेव्हा फक्त पाच मुले उत्तीर्ण होती. ८० गुणांच्या परीक्षेत विद्यार्थ्यांना चार, सहा, दहाच्या वर गुण मिळत नाहीत. विद्यार्थ्यांनी नोटबुक रिकाम्या ठेवल्या आहेत. त्यांच्या मते, मुलांना उत्तीर्ण होण्यासाठी आवश्यक असलेले ३३ टक्क्यांपर्यंतही गुण मिळालेले नाहीत. याप्रकरणी शिक्षण संचालक हिमांशू गुप्ता यांच्याकडे जाब विचारण्यात आला, मात्र त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही.
शाळांमध्ये गैरहजेरी अपयशाचे सर्वात मोठे कारण –
या शिक्षकांना एवढ्या मोठ्या संख्येने अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांचे कारण विचारले असता, विद्यार्थी शाळेत अजिबात येत नसल्याचे शिक्षकांनी सांगितले. त्यांची उपस्थिती खूपच कमी आहे. तसेच, गतवर्षीपर्यंत इयत्ता आठवीपर्यंत नो डिटेंशन पॉलिसी होती. अशा परिस्थितीत ते विद्यार्थ्याला नापास करू शकले नाहीत, त्याचाच परिणाम असा झाला की, पात्र नसेलले विद्यार्थीही उत्तीर्ण होऊन नववीत आले आणि आता हे विद्यार्थी नापास होत आहेत. त्यामुळे शाळांच्या अडचणी वाढल्या आहेत.
Large number of students fail Class IX and XI exams in Delhi government school teachers have to write answer sheets
महत्वाच्या बातम्या
- बिहारमध्ये हिंसाचार सुरूच; सासाराममध्ये बॉम्बस्फोट तर गोळीबाराच्या आवाजाने नालंदामध्ये दहशत, संचारबंदीही लागू!
- धक्कादायक : ‘एलिझा’ चॅटबॉटसोबत सहा आठवडे बोलल्यानंतर बेल्जियममधील व्यक्तीची अखेर आत्महत्या!
- राहुल गांधींच्या अडचणीत वाढ! आणखी एक मानहानीचा खटला हरिद्वार न्यायालयात दाखल
- नाशिकमधील वेदोक्त प्रकरण; संयोगिता राजेंच्या भूमिकेला संभाजीराजेंचा पाठिंबा