• Download App
    देशात सेकेंड हँड दुचाकींच्या मागणीत मोठी वाढ, क्रेडआर पाहणीत उघड; कोरोनाचा परिणाम । Large increase in demand for second hand bikes in the country, revealed in credr survey; Corona effect

    देशात सेकेंड हँड दुचाकींच्या मागणीत मोठी वाढ, क्रेडआर पाहणीत उघड; कोरोनाचा परिणाम

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : भारतातला मोठा टू-व्हीलर ब्रॅण्ड क्रेडआरला (CredR) वापरलेल्या दुचाकींसाठी मागणीमध्ये वाढ होताना दिसून येत आहे. जवळपास ९० टक्‍के विक्री व महसूल कोव्हिड आधीच्या पातळ्यांवर परतला आहे. Large increase in demand for second hand bikes in the country, revealed in credr survey; Corona effect

    क्रेडआरला लॉकडाऊनपासून मागणीमध्ये प्रचंड वाढ होताना निदर्शनास आली आणि सणासुदीत देखील हा ट्रेण्ड सुरू राहिला. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर बंधने आली. त्यामुळे दुचाकी हा एक सर्वोत्तम पर्याय ठरला आणि खरेदी वाढली. वाढती रहदारी आणि पेट्रोलच्या दरामध्ये वाढ झाल्यामुळे चारचाकीऐवजी हाय मायलेज दुचाकींकडे कल वाढला आहे.



    क्रेडआरचे मुख्य कार्यकारी अधिकारी ससीधर नंदिगम म्हणाले, “पूर्व-मालकीच्या किंवा सेकंड-हॅण्ड बाइक्स खरेदी करणाऱ्या लोकांच्या आकडेवारीमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. मागील एक वर्षामध्ये अनेक लोकांनी नोकऱ्या गमावल्या असल्यामुळे दुचाकी खरेदी किफायतशीर आहेत. यामुळे चारचाकींच्या विक्रीमध्ये घट होऊन दुचाकींसाठी मागणीमध्ये अधिक वाढ झाली आहे. लोक त्यांच्या गरजांनुसार क्रेडआर सारख्या ऑनलाइन ब्रॅण्ड्स व लिस्टिंग व्यासपीठांकडे वळत आहेत. त्यांना सोयीसुविधा व दर्जासाठी थोडेच प्रिमिअम भरणे देखील सोईस्कर जात आहे.”

    क्रेडआर कंपनी बाइकची विक्री करण्यापूर्वी १२० हून अधिक निरीक्षण व दर्जा तपासणी करते. व्यासपीठ युजर्सचे बजेट, शहर व चाललेल्या अंतरानुसार निवड करण्यासाठी बाइक्स व स्कूटर्सची व्यापक श्रेणी देते. यापेक्षाही अधिक सुविधा म्हणजे क्रेडआर बाइक खरेदी करण्याची इच्छा असलेल्यांना ६ महिन्यांची वॉरंटी व ७ -डे बाय प्रोटेक्शन देखील देते.

    Large increase in demand for second hand bikes in the country, revealed in credr survey; Corona effect

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Jagdeep Dhankhar उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचा अचानक राजीनामा; वैद्यकीय कारणास्तव पदत्याग

    Ahmedabad Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर सरकारने म्हटले- घाईत निष्कर्ष नको; अंतिम तपास अहवालाची प्रतीक्षा करा

    CM Yogi : सीएम योगी म्हणाले- कावडियांच्या वेशात बदमाश लपलेत, त्यांचा पर्दाफाश करू