• Download App
    लान्स नाईक विवेक कुमार यांच्या पत्नीने नवऱ्याला शेवटचा निरोप देताना आपल्या लग्नातील ड्रेस घातला, मेरा फौजी अमर रहे म्हणत दिला शेवटचा निरोप | Lance Naik Vivek Kumar's wife puts on her wedding dress while giving last farewell to her husband

    लान्स नाईक विवेक कुमार यांच्या पत्नीने नवऱ्याला शेवटचा निरोप देताना आपल्या लग्नातील ड्रेस घातला, मेरा फौजी अमर रहे म्हणत दिला शेवटचा निरोप

    विशेष प्रतिनिधी

    हिमाचल प्रदेश : देशाचे पहिले सीडीएस जनरल बिपीन रावत यांच्यासह हिमाचल प्रदेशचे लान्स नाईक विवेक कुमार यांनी देखील आपले प्राण हेलिकॉप्टर अपघातात गमावले. हेलिकॉप्टर अपघातात झालेल्या मृत्यूमुळे सारा देश हळहळला होता. लान्स नाईक विवेक कुमार यांचे पार्थिव शनिवारी त्यांच्या मूळगावी नेण्यात आले. येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

    Lance Naik Vivek Kumar’s wife puts on her wedding dress while giving last farewell to her husband

    यावेळी त्यांच्या आईने दु:ख व्यक्त करताना सांगितले की, माझ्या मुलाने देशासाठी बलिदान केले आहे आणि मला या गोष्टीचा अतिशय अभिमान आहे. त्यानी रडत रडतच पुढे सांगितले की, लान्स विवेक हे त्यांच्या कुटुंबाचे एकमेव आधार होते. त्यांचा दुसरा बेरोजगार आहे. आणि त्याने यासाठी सरकारकडे मदतीचे आवाहन देखील केले आहे.


    CDS Bipin Death : सीडीएस बिपिन रावत आणि त्यांच्या पत्नीच्या अस्थींचे आज गंगेत विसर्जन, मुली घेऊन जाणार


    याप्रसंगी लान्स नाइक विवेक कुमार यांच्या पत्नीने आपल्या लग्नातील ड्रेस घातला होता. आपल्या पतीला शेवटचा निरोप देताना त्या सतत म्हणत होत्या की, मेरा फौजी अमर रहे. हा अतिशय भावूक प्रसंग होता.

    हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनी यावेळी कुटुंबीयांना सरकारकडून 5 लाख रुपये दिले जातील अशी घोषणा केली आहे. त्याचप्रमाणे ते स्वतः देखील या कुटुंबाला 5 लाख रूपयांची मदत करणार आहेत, अशी घोषणा त्यांनी केली. या अंत्यविधीच्या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांच्यासह त्यांची आई पत्नी व इतर कुटुंबीय देखील उपस्थित होते. या सर्वांनी विवेक कुमार यांना श्रद्धांजली वाहिली.

    Lance Naik Vivek Kumar’s wife puts on her wedding dress while giving last farewell to her husband

     

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!