विशेष प्रतिनिधी
पाटणा : विधानसभा निवडणुकीत खोटे शपथपत्र सादर केले आणि संपत्तीची पूर्ण माहिती दिली नाही, असा आरोप बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांचे पुत्र तेजप्रताप यांच्यावर करण्यात आला आहे. त्यामुळे त्यांना अटक होण्याची शक्यता आहे.Lalu Prasad Yadav’s son Tejprasad Yadav will be arrested, false election affidavit
समस्तीपूर जिल्ह्यातील पोलीस ठाण्यात निवडणूक अधिकाऱ्याने तेजप्रताप यांच्याविरुद्ध तक्रारही दाखल केली आहे. तेजप्रताप यांनी हसनपूरमधून २०२० साली निवडणूक लढवताना संपत्तीविषयी चुकीची माहिती दिल्याची तक्रार जनता दल (यू) उमेदवाराने केली होती. ती तक्रार निवडणूक अधिकाऱ्याने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे पाठवली.
त्या तक्रारीतील तथ्य तपासण्यासाठी आयोगाने हे प्रकरण केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाकडे सोपवले. मंडळाने तेजप्रताप यांनी दिलेली माहिती खोटी असल्याचे अहवालात नमूद केले आहे.
प्राप्तिकर खात्याला दिलेली माहिती व आयोगाला दिलेली माहिती यात विसंगती असल्याबाबत खुलासा करण्यास तेजप्रताप यांना आयोगाने कळविले. मात्र, त्यांनी तो खुलासा केला नाही. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध तक्रार दाखल करण्याचे आदेश आयोगाने निर्वाचन अधिकाऱ्याला दिले होते.
भारतीय जनता पक्ष आणि जनता दलाने (यू) राष्ट्रीय जनता दल व लालुप्रसाद यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. तेजप्रताप हेही वडिलांप्रमाणे भ्रष्ट मागार्चा अवलंब करत आहेत, खोटे बोलत आहेत, असा आरोप दोन्ही पक्षांनी केला आहे.
Lalu Prasad Yadav’s son Tejprasad Yadav will be arrested, false election affidavit
महत्त्वाच्या बातम्या
- खिस्ती धर्मगुरूने केला अल्पवयीन मुलीवर बलात्कार, पत्नीने बनविला व्हिडीओ
- आत्मनिर्भर भारताच्या दिशेने आणखी एक पाऊल, 351 उपकरणांची संरक्षण मंत्रालय करणार नाही आयात
- तलाकशुदा महिलांशी पंतप्रधानांनी साधला संवाद, स्वावलंबी होण्याचा दिला मंत्र
- मनी मॅटर्स : लवकर निवृत्त होणे म्हणणे फार सोपो, पण नोकरी सोडताना हा विचार कराच