• Download App
    लालूप्रसाद यादव यांचा चिराग पासवान यांना गळाला लावण्याचा प्रयत्न, तेजस्वी आणि त्यांनी एकत्र यावे अशी व्यक्त केली इच्छा|Lalu Prasad Yadav's attempt to hug Chirag Paswan, openly wished Tejaswi and Chirag come together

    लालूप्रसाद यादव यांचा चिराग पासवान यांना गळाला लावण्याचा प्रयत्न, तेजस्वी आणि त्यांनी एकत्र यावे अशी व्यक्त केली इच्छा

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : तुरुंगातून बाहेर आल्यावर राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांनी आपले राजकारण सुरू केले आहे. लोकजनशक्ती पक्षाचे अध्यक्ष खासदार चिराग पासवान यांना गळाला लावण्याचे त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. तेजस्वी यादव आणि चिराग पासवान यांनी एकत्र यावे अशी आपली इच्छा असल्याचे त्यांनी म्हटले आहे. मात्र, चिराग यांनी त्याला नकार दिला आहे.Lalu Prasad Yadav’s attempt to hug Chirag Paswan, openly wished Tejaswi and Chirag come together

    लालूप्रसाद यादव पत्रकारांशी बोलताना म्हणाले, लोकजनशक्ती पक्षामध्ये जे काही घडले असेल पण चिराग पासवान हेच पक्षाचे नेते आहेत. त्यामुळे त्यांनी राष्ट्रीय जनता दलासोबत यावे असे वाटते.



    गेल्या महिन्यात राजदचे राष्ट्रीय सरचिटणीस श्याम रजक यांनी लोक जनशक्ती पक्षाचे (एलजेपी) नेते चिराग पासवान यांची नवी दिल्ली येथील निवासस्थानी भेट घेतली होती. त्यापूर्वी लालूप्रसाद यादव यांचे चिरंजीव आणि माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी चिराग पासवान यांना सोबत येण्याचे आवाहन केले होते.

    चिराग यांचे काका पशुपती पारस यांनी बंडखोरी केली आहे. पक्षाच्या पाच खासदारांनी त्यांना साथ दिली आहे. त्यामुळे चिराग पासवान यांनाच पक्षातून काढून टाकण्यात आले होते. त्यानंतर पशुपती पारस यांना केंद्रात जनता दलाच्या (संयुक्त) कोट्यातून केंद्रीय मंत्रीपदही मिळाले आहे.

    एलजेपीची स्थापना माजी केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांनी 2000 मध्ये केली होती. बिहारच्या राजकारणातील वजनदार नेते पासवान यांचे आॅक्टोबर 2020 मध्ये निधन झाले होते. मात्र, त्यानंतर चिराग पासवान यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्याविरोधात मोर्चा उघडला. त्यांच्यावर सातत्याने टीकाही केली होती.

    बिहार विधानसभेच्या निवडणुकीत पासवान यांच्या लोकजनशक्ती पक्षाने जनता दलाच्या विरोधात निवडणूक लढविली होती. त्यामुळे अनेक जागांवर नितीश कुमार यांना फटका बसला.त्यामुळे त्यांनी चिराग यांचे काका पशुपती कुमार पारस यांना आपल्याकडे वळविले आहे.

    Lalu Prasad Yadav’s attempt to hug Chirag Paswan, openly wished Tejaswi and Chirag come together

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य