विशेष प्रतिनिधी
डेहराडून : कुंभमेळ्यातील तिसऱ्या शाही स्नानाच्यावेळी हरिद्वारमधील हर कौ पौडीमध्ये लाखो साधू आणि भाविकांची गंगेत डुबकी मारण्यासाठी झुंबड उडाली होती.दुपारपर्यंत आठ ते दहा लाख भाविकांचे स्नान झाले होते.Lakhs of devotees attended Kumbh mela
१३ पैकी चार आखाड्यांच्या साधूंचाही त्यात समावेश होता. कोणताही अडथळा न येता शाहीस्नान सुरळीत पार पडत आहे.आखाड्याच्या साधूंनी आपल्याबरोबर पालख्या सजवून त्यात देवतांचे मुखवटे, मुर्ती आणल्या होत्या. या मूर्तींनाही स्नान घालण्यात आले.
हर की पौडीचा परिसर केवळ साधुंसाठी राखीव होता. हरिद्वार आणि ऋषिकेष येथील इतर घाटांवर लाखो सामान्य भाविकांनी स्नान केले.प्रारंभी पहाटे नीरंजनी आखाड्याचे आचार्य कैलाशानंद गिरी यांच्या नेतृत्वाखाली साधू आणि नागा सन्याशांनी स्नान केले.
त्यानंतर आनंद आखाड्याचे साधू गंगेत उतरले. जुना आखाड्याच्या साधूंची संख्या सर्वाधिक होती. त्यांचे नेतृत्व स्वामी अवधेशानंद यांनी केले.मेष संक्रांत आणि बैसाखीनिमित्त शाहीस्नानाची पर्वणी होती. दोन दिवस आधी सोमवती अमावस्येनिमित्त दुसरे शाही स्नान झाले होते.
त्यानंतर १०२ जणांना कोरोना संसर्ग झाला, मात्र सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे कुंभमेळ्यात अशक्य असल्याचे चित्र दिसत आहे.