• Download App
    Lakhimpur Kheri Voilence: सुप्रीम कोर्टात लखीमपूर खीरी हिंसाचार प्रकरणी सुनावणी;यूपी पोलिसांच्या तपासावर सर्वोच्च न्यायालयाने उपस्थित केले प्रश्न । Lakhimpur Kheri violence: SC unhappy with UP govt report, will appoint ex-HC judge to monitor probe

    Lakhimpur Kheri Voilence: सुप्रीम कोर्टात लखीमपूर खीरी हिंसाचार प्रकरणी सुनावणी;यूपी पोलिसांच्या तपासावर सर्वोच्च न्यायालयाने उपस्थित केले प्रश्न

    लखीमपूर खीरी हिंसाचार प्रकरणी सुप्रीम कोर्टात आज 8 नोव्हेंबरला सुनावणी झाली आहे. सर्वोच्च न्यायालयाने 26 ऑक्टोबरला उत्तर प्रदेश सरकारला साक्षीदारांचे संरक्षण करण्याचे निर्देश दिले होते.


    लखीमपूर खेरी हिंसाचार प्रकरण: मुख्य न्यायमूर्ती एनव्ही रमणा, न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती हिमा कोहली यांच्या खंडपीठाने उत्तर प्रदेश सरकारतर्फे उपस्थित असलेले ज्येष्ठ वकील हरीश साळवे आणि गरिमा प्रसाद यांना शुक्रवारी या प्रकरणावर उत्तर दाखल करण्याचे निर्देश दिले. Lakhimpur Kheri violence: SC unhappy with UP govt report, will appoint ex-HC judge to monitor probe


    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : लखीमपूर खीरी हिंसाचार प्रकरणी सुप्रीम कोर्टात आज नोव्हेंबरला सुनावणी झाली आहे. सरन्यायाधीश एन व्ही रमणा, न्यायमूर्ती सूर्यकांत आणि हिमा कोहली यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी करण्यात आली. सोमवारी झालेल्या या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने उत्तर प्रदेश सरकारच्या तपासावर गंभीर प्रश्न उपस्थित केले. सरन्यायाधीश एनव्ही रमणा, न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती हिमा कोहली यांच्या खंडपीठाने उत्तर प्रदेश सरकारतर्फे उपस्थित ज्येष्ठ वकील हरीश साळवे आणि गरिमा प्रसाद यांना शुक्रवारपर्यंत उत्तर दाखल करण्याचे निर्देश दिले.

    यूपी सरकारच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात उपस्थित असलेले वकील हरीश साळवे म्हणाले की, आम्ही स्टेटस रिपोर्ट दिला आहे. सीसीटीव्हीवरून आम्ही आरोपी हजर असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यावर सरन्यायाधीश म्हणाले की, लॅबचा अहवालही आला नाही, आरोपींचे मोबाईल कुठे होते? आशिष मिश्रा यांचा भ्रमणध्वनी कुठे होता, तुम्ही रिपोर्टमध्ये याचे उत्तर दिले?

    अन्य आरोपींकडे मोबाईल फोन नाहीत: CJI

    हरीश साळवे यांनी सांगितले की, आम्ही आशिषच्या मोबाईलचे लोकेशन दिले आहे. स्थिती अहवाल पहा. यावर सरन्यायाधीश म्हणाले की, इतर आरोपींच्या मोबाईलचे लोकेशन कुठे आहे? आरोपींकडे मोबाईल नाही का? तुम्ही अहवालाच्या पॅरा 7 चा संदर्भ देत आहात. त्यात काहीच नाही.

    सर्व बाबींचा तपास सुरू : हरीश साळवे

    हरीश साळवे म्हणाले, आम्ही लॅबशी संपर्क साधत आहोत. पोलीस तपास करत असून सर्व बाबी तपासल्या जात आहेत. CJI म्हणाले की, सेल टॉवरद्वारे तुम्ही ओळखू शकता की परिसरात कोणते मोबाइल सक्रिय होते? न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले की आम्हाला हे सांगताना दुःख होत आहे की प्रथमदर्शनी असे दिसते की 2 एफआयआर ओव्हरलॅप करून विशिष्ट आरोपीला फायदा दिला जात आहे. हरीश साळवे म्हणाले की, प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आहेत. हे आरोपी घटनास्थळीच असल्याचे सबळ पुरावे आहेत. सीसीटीव्ही फुटेजद्वारे स्पष्ट केले आणि आम्ही साक्षीदारांना त्यांचे म्हणणे नोंदवण्यासाठी बोलावले आहे.

    Lakhimpur Kheri violence : SC unhappy with UP govt report, will appoint ex-HC judge to monitor probe

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य