• Download App
    Lakhimpur Kheri Violence: आरोपी आशिष मिश्राला तीन दिवसांची पोलीस कोठडी, पोलिसांनी केली होती 14 दिवसांच्या कोठडीची मागणी । Lakhimpur Kheri Violence Ashish Mishra Got 3 Days PC

    Lakhimpur Kheri Violence : आरोपी आशिष मिश्राला तीन दिवसांची पोलीस कोठडी, पोलिसांची 14 दिवसांच्या कोठडीची होती मागणी

    Lakhimpur Kheri Violence : लखीमपूर खेरी हिंसाचारातील मुख्य आरोपी आशिष मिश्राला तीन दिवसांच्या पोलीस कोठडीत पाठवण्यात आले. खरेतर पोलिसांनी 14 दिवसांची कोठडी मागितली होती. आशिष आता 12 ते 15 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडीत असेल. आशिष हा केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा टेनी यांचा मुलगा आहे. Lakhimpur Kheri Violence Ashish Mishra Got 3 Days PC


    प्रतिनिधी

    लखनऊ : लखीमपूर खेरी हिंसाचारातील मुख्य आरोपी आशिष मिश्राला तीन दिवसांच्या पोलीस कोठडीत पाठवण्यात आले. खरेतर पोलिसांनी 14 दिवसांची कोठडी मागितली होती. आशिष आता 12 ते 15 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडीत असेल. आशिष हा केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा टेनी यांचा मुलगा आहे.

    सरकारी वकील एसपी यादव यांनी सांगितले की, आशिष मिश्राला 3 दिवसांच्या पोलीस कोठडीवर पाठवण्यात आले आहे. फिर्यादींनी 14 दिवसांची मागणी केली होती, परंतु तीन दिवसांची कोठडी मंजूर करण्यात आली आहे. अटींसह 12 वी ते 15 वीपर्यंत रिमांड असेल. यादरम्यान वैद्यकीय चाचणी केली जाईल आणि त्रास दिला जाणार नाही. त्यांचे वकील लांब उभे राहून बोलू शकतात.

    याआधी आशिषचे वकील अवधेश सिंह म्हणाले की, एसआयटीने 40 प्रश्न विचारणार असल्याचे म्हटले होते, पण आशिषला हजारो प्रश्न विचारले गेले. आता काय विचारायचे बाकी आहे, ज्यासाठी पोलीस कोठडी आवश्यक आहे? तुमच्याकडे आणखी काही प्रश्नांची यादी असल्यास ती दाखवा. आशिषने तपास अधिकाऱ्यापुढे कलम 161 अन्वये आधीच निवेदन नोंदवले आहे. असे असले तरी पोलिसांनी मीडियाला दिलेल्या निवेदनात म्हटले की, आशिषने तपासात सहकार्य केले नाही. अवधेश म्हणाले की, एसआयटीने सांगावे की त्यांना कोठडी का हवी आहे, त्यांना आशिषला कुठे न्यायचे आहे? त्याचबरोबर फिर्यादी वकिलांनी सांगितले की, तपास पथकाला अनेक प्रश्न विचारायचे होते, पण आशिषने 12 तासांत फक्त 40 प्रश्नांची उत्तरे दिली.

    लखीमपूर खेरीमध्ये आठ जणांचा मृत्यू

    3 ऑक्टोबर रोजी लखीमपूर खेरी हिंसाचारात चार शेतकऱ्यांसह आठ जणांचा मृत्यू झाला. केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्राला 12 तासांच्या चौकशीनंतर शनिवारी रात्री लखीमपूरमध्ये अटक करण्यात आली होती. दुसरीकडे, महाराष्ट्रात लखीमपूर हिंसाचाराचा निषेध म्हणून आज सत्ताधारी महाविकास आघाडीने बंद पुकारला आहे.

    Lakhimpur Kheri Violence Ashish Mishra Got 3 Days PC

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!