लखीमपूर हिंसाचार प्रकरणातील आरोपी आणि केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्रा याला डेंग्यू झाला आहे. त्याची शुगर लेव्हलही लक्षणीय वाढली आहे. शुक्रवारी एसआयटीने आशिषला पुन्हा दोन दिवसांच्या रिमांडवर घेतले होते. मात्र, आता प्रकृती अस्वास्थ्यामुळे चौकशी स्थगित करण्यात आली आहे. आज 24 ऑक्टोबरला सायंकाळी 5 वाजेपर्यंत पोलिस कोठडी होती, मात्र रिमांड संपण्यापूर्वीच आशिषला कारागृह रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. Lakhimpur Kheri Violence Accused Ashish Mishra Suffering From Dengue Admitted To Jail Hospital
वृत्तसंस्था
लखनऊ : लखीमपूर हिंसाचार प्रकरणातील आरोपी आणि केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्रा याला डेंग्यू झाला आहे. त्याची शुगर लेव्हलही लक्षणीय वाढली आहे. शुक्रवारी एसआयटीने आशिषला पुन्हा दोन दिवसांच्या रिमांडवर घेतले होते. मात्र, आता प्रकृती अस्वास्थ्यामुळे चौकशी स्थगित करण्यात आली आहे. आज 24 ऑक्टोबरला सायंकाळी 5 वाजेपर्यंत पोलिस कोठडी होती, मात्र रिमांड संपण्यापूर्वीच आशिषला कारागृह रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
एसआयटीला बॅलिस्टिक अहवालाची प्रतीक्षा
मुख्य आरोपी आशिष मिश्रा हा हिंसाचाराच्या वेळी उपस्थित होता की नाही हे एसआयटीला अद्याप वदवून घेता आलेले नाही. तथापि, सर्व पुरावे सूचित करतात की तो घटनास्थळी होता. आतापर्यंतच्या तपासाबद्दल बोलताना, पोलिसांना फॉरेन्सिक लॅबमधून आशिष आणि अंकित दास यांच्या शस्त्रांचा बॅलिस्टिक अहवाल, बीटीएस टॉवरवरून सिग्नल गर्दीचा अहवाल, मोबाईल फोनचा सायबर अहवाल अद्याप मिळालेला नाही. त्यानंतरच आशिषची घटनास्थळी उपस्थिती आणि त्याची भूमिका निश्चित होईल.
आतापर्यंत 13 जणांना अटक
लखीमपूर हिंसाचारप्रकरणी गुन्हे शाखेने शुक्रवारी आणखी तीन आरोपींना अटक केली आहे. शेतकऱ्यांना चिरडणाऱ्या थार जीपच्या मागे हे तिघे स्कॉर्पिओमध्ये होते. मोहित त्रिवेदी, धर्मेंद्र सिंह आणि रिंकू राणा अशी त्यांची नावे आहेत. हे तिघेही मुख्य आरोपी आशिष मिश्राच्या जवळचे आहेत. या घटनेचे प्रत्यक्षदर्शी सुमीत जयस्वाल याच्यानंतर या तिघांची अटक ही मोठी कारवाई मानली जात आहे.
याप्रकरणी आतापर्यंत 13 जणांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये मुख्य आरोपींमध्ये आशिष मिश्रा, अंकित दास, लतीफ ऊर्फ काले, शेखर, लवकुश, आशिष पांडे, सुमित जैस्वाल मोदी, सत्यम त्रिपाठी, नंदन सिंह, शिशुपाल यांचा समावेश आहे.
Lakhimpur Kheri Violence Accused Ashish Mishra Suffering From Dengue Admitted To Jail Hospital
महत्त्वाच्या बातम्या
- UP Election 2022 : प्रियांका गांधींची मोठी घोषणा, उत्तर प्रदेशात सत्ता आल्यास मुलींना देणार स्मार्टफोन आणि स्कूटी
- पाकिस्तानात वाढत्या महागाईमुळे विरोधक उतरले रस्त्यावर, जुलमी इम्रान सरकारपासून सुटका मिळण्याची मागणी
- सर्वोच्च न्यायालयाचे CJI रमण्णा यांनी कायदामंत्र्यांसमोरच पायाभूत सुविधांवर केला सवाल, म्हणाले – ‘न्यायालयांसाठी उत्तम पायाभूत सुविधा ही फक्त एक कल्पना!’
- महागाईचा परिणाम : 14 वर्षांनंतर वाढणारे आगपेटीचे दर, एका झटक्यात दुप्पट होणार किंमत