• Download App
    महाराष्ट्राच्या लेडी सिंघम मेहूल चोक्सीला भारतात आणण्यासाठी डॉमिनिकात दाखल, कोण आहेत आयपीएस शारदा राऊत Lady Singham of Maharashtra arrives in Dominica to bring Mehul Choksi to India, who is IPS Sharda Raut

    महाराष्ट्राच्या लेडी सिंघम मेहूल चोक्सीला भारतात आणण्यासाठी डॉमिनिकात दाखल, कोण आहेत आयपीएस शारदा राऊत

    पंजाब नॅशनल बॅँकेला १३,५०० कोटी रुपयांचा चुना लावून पळून गेलेला हिरेव्यापारी मेहूल चोक्सी याला भारतात आणण्यात येणार आहे. यासाठी डॉमिनिकात दाखल झालेल्या सीबीआयच्या टीमचे नेतृत्व महाराष्ट्राच्या लेडी सिंघम शारदा राऊत करत आहेत. Lady Singham of Maharashtra arrives in Dominica to bring Mehul Choksi to India, who is IPS Sharda Raut


    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : पंजाब नॅशनल बॅँकेला १३,५०० कोटी रुपयांचा चुना लावून पळून गेलेला हिरेव्यापारी मेहूल चोक्सी याला भारतात आणण्यात येणार आहे. यासाठी डॉमिनिकात दाखल झालेल्या सीबीआयच्या टीमचे नेतृत्व महाराष्ट्राच्या लेडी सिंघम शारदा राऊत करत आहेत.

    पंजाब नॅशनल बॅँकेच्या गैरव्यवहार प्रकरणातील तपासप्रमुख शारदा राऊत आहेत. शारदा राऊत या महाराष्ट्रातील डॅशींग पोलीस अधिकारी म्हणून ओळखल्या जातात. शारदा राऊत यांचा जन्म महाराष्ट्राच्या नाशिकमध्ये झाला आहे. त्या 2005 बॅचच्या आयपीएस अधिकारी आहेत.



    पालघरमध्ये पोलीस अधीक्षक (एसपी) असताना त्यांनी गुन्हेगाी जगताला हादारा दिला होता. नागपूर, मीरा रोड, नंदुरबार, कोल्हापूर, मुंबई आदी शहरांमध्ये त्यांनी कायदा व सुव्यवस्था राखण्यात मोठे योगदान दिले होते. त्यामुळेच केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) बॅँकींग फ्रॉड विभागाच्या प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली. सीबीआयच्या मुंबई कार्यालयाच्या बॅँकींग फ्रॉड विभागाच्या त्या प्रमुख म्हणून काम करतात. पोलीस महानिरिक्षक (डेप्युटी इन्स्पेक्टर जनरल- डीआयजी) या पदावर सध्या त्या कार्यरत आहेत.

    मेहुल चोक्सीच्या प्रत्यार्पणासंबंधीच्या सुनावणीमध्ये शारदा राऊत यांच्या नेतृत्वाखालील ही टीम वकिलांना मदत करणार आहे. ईडीची टीम उद्या तेथील न्यायालयात अ‍ॅफिडेव्हीट दाखल करणार आहे. यामध्ये मेहुल चोक्सी हा भारतीय नागरिक असल्याचे सांगितले जाईल. याचा अहवाल तयार असून केंद्र सरकारच्या मंजुरीनंतर तो न्यायालयात सादर केला जाणार आहे.

    Lady Singham of Maharashtra arrives in Dominica to bring Mehul Choksi to India, who is IPS Sharda Raut

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!