विशेष प्रतिनिधी
पुणे : इंस्टाग्राम अकाऊंटवर ५० हजार लाईक मिळावे म्हणून शिवीगाळ करणाºया एका लेडी डॉन म्हणून मिरवणाºया तरुणीला पोलिसांनी चांगलीच अद्दल शिकवली आहे. या तरुणीसह तिच्या साथीदारांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.Lady Dawn want 50,000 likes on Instagram,started abusing
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साक्षी महाले असं या तरुणीचे नाव आहे. ही तरुणी पिंपरी-चिंचवडमध्ये स्वयंम घोषित लेडी डॉन म्हणून वावरत होती. या तरुणीने इंस्टाग्रामावर आपल्या ५० हजार लाईक मिळावे म्हणून शिव्या देत होती. ३०२ अर्थात खून करण्याची धमकीही दिली होती. त्यामुळे पोलिसांनी तिच्यासह तिच्या इतर साथीदाराविरुद्ध गंभीर गुन्हे दाखल केले आहेत.
साक्षी आणि कुणाल कांबळे त्याच बरोबर त्यांचे इतर मित्र इन्स्टाग्रामवर थेरगाव क्वीन नावाच्या प्रोफाइल वरून नागरिकांना धमकवण्याचे आणि अत्यंत खालच्या पातळीचे शब्द वापरून इंस्टाग्रामवर रील बनवत होते. या प्रकार दिवसेंदिवस वाढतच चालला होता. त्यामुळे या टोळक्याविरोधात तक्रारी वाढल्याने पोलिसांनी त्याची तात्काळ दखल घेतली आणि या सर्वांविरुद्ध गंभीर गुन्हे दाखल केले.
त्याच बरोबर सोशल मीडियाचा वापर करताना केवळ लाईक्स मिळाव्यात म्हणून कुणीही असं बेकायदेशीर कृत्य करत असल्यास त्यांच्या विरुद्धही कायदेशीर कारवाई केला जाईल असा इशाराही पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिला आहे.
काही दिवसांपूर्वी पिंपरी चिंचवडमध्ये फोनवर भाई म्हटला नाही म्हणून एका गुंडाने आपल्या साथीदारांसह एका तरुणाला बेदम मारहाण केली होती. एवढंच नाहीतर जमिनीवर बिस्किट टाकून कुत्र्यासारखी ती बिस्किट खायला लावली होती. या संबंध प्रकाराचा व्हिडीओ आरोपींनी बनवत सोशल मीडियावर व्हायरल केला होता.
या प्रकरणाची गंभीर दखल पिंपरी चिंचवड पोलिसांनी घेतली. पोलिसांनी या प्रकरणी पाच जणांना बेड्या ठोकल्या.आरोपींना अद्दल घडविण्यासाठी पिंपरी चिंचवड पोलिसांनी गुंडांचं मुंडन करुन शहरात धींड काढली.
Lady Dawn want 50,000 likes on Instagram,started abusing
महत्त्वाच्या बातम्या
- वार-पलटवार : आमची वायनरी असेल तर त्यांनी ती ताब्यात घ्यावी, भाजप नेत्यांची मुलं केळी विकतात का? संजय राऊतांचे किरीट सोमय्यांना आव्हान
- विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी उघडकीस आणले होते अजमेर सामूहिक बलात्काराचे प्रकरण
- मोठी बातमी : संजय राऊतांच्या परिवाराची वाईन व्यावसायिकासोबत भागीदारी, राऊतांच्या दोन्ही मुली संचालक, किरीट सोमय्यांचा आरोप