• Download App
    उत्तर प्रदेश, बिहारमधील मजुरांची फरफट, दिल्ली लॉकडाऊन घोषणेचा परिणाम ; बस, रेल्वे स्थानकावर मजुरांची गावी जाण्यासाठी गर्दी ।Labor riots in Uttar Pradesh, Bihar, Delhi lockdown announcement result

    उत्तर प्रदेश, बिहारमधील मजुरांची फरफट, दिल्ली लॉकडाऊन घोषणेचा परिणाम ; बस, रेल्वे स्थानकावर मजुरांची गावी जाण्यासाठी गर्दी

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता दिल्लीत 26 एप्रिलपासून लॉकडाऊनची घोषणा झाली आहे. त्यामुळे प्रवासी मजुरांची फरपट होत आहे. लॉकडाऊनपूर्वी अनेक मजुरांनी आपल्या गावचा रस्ता धरला असून बस आणि रेल्वे स्थानकावर गर्दी केली. Labor riots in Uttar Pradesh, Bihar, Delhi lockdown announcement result

    आनंद विहार आणि कौशांबी बस स्थानकावर उत्तर प्रदेश आणि बिहारला जाण्यासाठी लोकांनी गर्दी केली. गेल्या वर्षीही मजुरांची गर्दी दिल्ली सीमेवर झाली होती. लॉकडाऊन वाढवला तर घरी जाण्यास अडचण होईल म्हणून मजुरांनी गावची वाट धरली आहे.



    मजूर धोका पत्करण्याची तयार नाहीत

    मजुरांना दिल्ली सोडू नका, असे आवाहन मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केले होते. मजुरांची काळजी घेतली जाईल, असे आश्वासन दिले होते. यंदा फक्त 6 दिवसांचा लॉकडाऊन आहे, असेही केजरीवाल यांनी सांगितले. पण मजुरांनी बस आणि रेल्वे स्थानकांवर गर्दी केली. गेल्या वर्षीचा अनुभव प्रवासी मजूर विसरलेले नाहीत. ते कुठलाही धोका पत्करण्याची मजुरांची इच्छा नाही.

    Labor riots in Uttar Pradesh, Bihar, Delhi lockdown announcement result

    Related posts

    Khalistanis : कॅनडात खालिस्तान्यांनी 100-100 डॉलर देऊन गर्दी जमवली; मंदिराबाहेर हिंदू-भारतविरोधी घोषणा दिल्या

    Delhi High Court : केजरीवालांच्या भाड्याच्या आश्वासनावर HCने आदेश फिरवला; म्हटले- माध्यमांमध्ये दिलेले विधान लागू करण्यायोग्य नाही

    Supreme Court : सर्वोच्च न्यायालयाने पश्चिम बंगालच्या मुख्य सचिवांना फटकारले; तपास NIA कडे