• Download App
    हरिद्वारच्या कुंभमेळ्याला उत्साहात सुरुवात, यंदाच्या सोहळ्यावर कोरोनाची गडद छाया|Kumbhmela begins in haridwar

    हरिद्वारच्या कुंभमेळ्याला उत्साहात सुरुवात, यंदाच्या सोहळ्यावर कोरोनाची गडद छाया

    विशेष प्रतिनिधी 

    हरिद्वार : तमाम हिंदूंच्या श्रद्धेचा विषय असलेल्या हरिद्वार येथील कुंभमेळ्याला उत्साहात सुरुवात झाली. उत्तराखंडमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढल्याने खबरदारीचा उपाय म्हणून राज्य सरकारने विविध नियम केले आहेत.Kumbhmela begins in haridwar

    मात्र या सोहळ्यावर कोरोनाची गडद छाया पसरलेली आहे.उत्तराखंडने उत्तरप्रदेशला लागून असलेल्या सीमांवर आता बारीक नजर ठेवली असून नरसान आणि उधमसिंह नगर जिल्ह्यांमध्ये भाविकांच्या चाचण्या घेतल्या जात असून ज्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आहेत त्यांनाच पुढे सोडले जात आहे.



    कुंभमेळ्यात येण्यासाठी पोर्टलवर नोंदणी करणे बंधनकारक असून भाविकांना देखील निगेटिव्ह रिपोर्ट असेल तरच प्रवेश देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.कोरोनाचे संकट लक्षात घेऊन उत्तराखंड उच्च न्यायालयाने राज्य सरकारला रोज पाच ते पन्नास हजार कोरोना चाचण्या घेण्याचे निर्देश दिले आहेत.

    उत्तराखंडमध्ये डेहराडून आणि हरिद्वार येथे कोरोनाबाधितांची संख्या सर्वाधिक आहे. कोरोनामुळे प्रथमच कुंभमेळ्याच्या काळात एक महिन्याने कपात करण्यात आली आहे.

    Kumbhmela begins in haridwar

     

    Related posts

    Anmol Bishnoi : बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी अनमोल बिष्णोईला अटक, भारतात येताच एनआयएची कारवाई

    Nitish Kumar : नितीशकुमार एनडीएच्या नेतेपदी, आज दहाव्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार

    SC OBC Reservation : OBC आरक्षण सुनावणीवेळी सुप्रीम कोर्टाची महाराष्ट्र सरकारला सूचना- उमेदवारी अर्ज प्रक्रिया पुढे ढकलण्याचा विचार करा!