• Download App
    बलात्कार करणाऱ्या नराधमांना तेलंगणप्रमाणे गोळ्या घालून ठार मारा, माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी यांची वादग्रस्त मागणी |Kumarsway took contoversla statement once again

    बलात्कार करणाऱ्या नराधमांना तेलंगणप्रमाणे गोळ्या घालून ठार मारा, माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी यांची वादग्रस्त मागणी

    विशेष प्रतिनिधी

    बंगळूर – तेलंगणमध्ये दोन वर्षांपूर्वी बलात्कार केलेल्या आरोपींना पळून जाताना पोलिसांनी ज्याप्रमाणे गोळ्या घालून ठार केले तसेच म्हैसूरमधील वैद्यकीय विद्यार्थिनीवर पाशवी कृत्य केलेल्यांच्या बाबतीत व्हावे, असे जेडीएस पक्षाचे नेते आणि कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी म्हटले आहे.Kumarsway took contoversla statement once again

    ते म्हणाले हैदराबाद पोलिसांनी जे केले त्याची मी प्रशंसा करतो. कठोर कारवाई केली नाही तर परिस्थिती सुधारणार नाही. सरकारने हे प्रकरण थेट हाताळायला हवे आणि हैदराबादमध्ये जे घडले त्याची पुनरावृत्ती करावी. सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करण्यापासून सरकार आणि पोलिस लोकांना रोखू शकत नाही. त्यातून असे प्रकार घडतात.



    आपल्या सध्याच्या पद्धतीत आरोपींना तुरुंगात पाठविले जाते. काही दिवसांनी जामीन मिळवून ते बाहेर येतात. कितीही अपराध केले तरी काहीच घडणार नाही हे गुन्हेगारांना पक्के माहीत आहे.हैदराबादमधील शम्साबाद येथे २०१९ मध्ये चार युवकांनी पशुवैद्यकीय तज्ज्ञ डॉ. प्रियांका रेड्डी हिच्यावर बलात्कार केला.

    त्यानंतर तिला ठार मारून तिचा मृतदेह पेटविला होता. पोलिसांनी तपासासाठी आरोपींना घटनास्थळी नेले तेव्हा त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे पोलिसांना गोळ्या झाडाव्या लागल्या. त्यात चारही आरोप मारले गेले.

    Kumarsway took contoversla statement once again

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य