वृत्तसंस्था
वॉशिंग्टन : अमेरिकेत स्थायिक होऊन सर्वांधिक यशस्वी झालेल्या भारतीय समुदायांमध्ये काश्मीारी पंडितांचा समावेश होतो, असे कौतुगोद्गार अमेरिकेतील भारतीय वंशाचे खासदार राजा कृष्णमूर्ती यांनी आज काढले. अमेरिकेच्या कॅपिटॉल इमारतीत ‘द काश्मीीर फाइल्स’ या चित्रपटाच्या विशेष खेळाचे आयोजन करण्यात आले होते. Krushnamurty praises Kasmiri Pandits
चित्रपटानंतर काश्मीोरी पंडितांच्या समुदायासमोर बोलताना कृष्णमूर्ती म्हणाले,‘‘ज्यावेळी तुम्ही जीव मुठीत घेऊन पळता आणि तुमची मालमत्ताही हिरावून घेतली जाते, त्यावेळी तुम्हाला जीवनाचा खरा अर्थ समजतो. त्यावेळी तुम्हाला इतर गोष्टींचे महत्त्व समजते. अमेरिकेत आलेल्या काश्मीररी पंडितांनी त्यांच्यासमोर आलेल्या आव्हानांचा सामना केला, त्यांच्यावर मात केली आणि यश मिळविले.’’ विवेक अग्निहोत्री यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून अभिनेत्री पल्लवी जोशी यांनी निर्मिती केली आहे.