विशेष प्रतिनिधी
कोझीकोडे : कोझीकोडे आकाशवाणी रेडिओ स्टेशनने वीर सावरकरांवरील एक नाटक प्रसारित करण्यास नकार दिला आहे. अखिल भारतीय रेडिओने आकाशवाणीच्या सर्व राज्यातील आकाशवाणी केंद्रांना वीर सावरकरांवरील नाटक प्रक्षेपित करण्याचे आदेश दिले होते. आकाशवाणीने नाटकाची स्क्रिप्टही दिली होती. ती स्क्रिप्ट स्थानिक भाषेत अनुवादित करायची होती. त्यांनंतर ती प्रक्षेपित करायची होती.
Kozhikode akashavani radio station refuses to play drama on veer savarkar
केरळमध्ये एकूण आठ रेडिओ स्टेशन आहेत. आणि रोटेशन बेसिसवर वेगवेगळ्या स्टेशनवर वेगवेगळ्या दिवशी नाटक प्रक्षेपित करावे लागते. पण कोझीकोडे रेडिओ स्टेशनने तिरुअनंतपुरम रेडिओ स्टेशनला कळवले आहे की वीर सावरकरांवरील नाटक उद्या प्रसारित केले जाऊ शकत नाही.
कोझीकोडे रेडिओ स्टेशन मधील कर्मचाऱ्यांना कोविडची लागण झाल्यामुळे हे नाटक प्रक्षेपित केले जाऊ शकत नाही असे प्राथमिक स्तरावरून कळते. अशावेळी स्टेशनमास्तरला नाटक दुसऱ्या रेडिओ स्टेशनवर हस्तांतरित करण्याचा पूर्ण अधिकार असतो. पण नेमके कोणत्या कारणामुळे हा नकार कळवण्यात आला आहे याबाबतीत बरेच प्रश्न उठवले जात आहेत.
Kozhikode akashavani radio station refuses to play drama on veer savarkar
महत्त्वाच्या बातम्या
- सरकारने निवडणुकीची थट्टा मांडली, प्रभागरचनेचा उद्देश सांगावा, लोकांनी एकावेळी किती बोटं दाबायची? नाशकात राज ठाकरेंचा हल्लाबोल
- Corona Spread : लाओसच्या गुफांमध्ये आढळली कोरोनाचा संसर्ग पसरवणारी वटवाघुळे, शास्त्रज्ञांचा गंभीर इशारा
- 21 हजार कोटींचे हेरॉईन जप्त झाल्याची अंमलबजावणी संचालनालयाने घेतली दखल, मनी लाँडरिंगची करणार चौकशी
- जम्मू-काश्मीरच्या शोपियानमध्ये सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत एक दहशतवादी ठार, पिस्तूल आणि दारुगोळा जप्त
- तालिबानला मान्यता देण्यासाठी चीनचा उतावीळपणा, आर्थिक निर्बंध लवकर उठवण्याचे जगाला केले आवाहन