• Download App
    चेन्नईतल्या गावात लसीकरण वाढवण्यासाठी मोफत बिर्यानी अन् बक्षिसांची लयलूट, गावकऱ्यांत लागली चढाओढ । Kovalam Village In Chennai Provides Free Biryani and many gifts to those who take the vaccine

    चेन्नईतल्या गावात लसीकरण वाढवण्यासाठी मोफत बिर्यानी अन् बक्षिसांची लयलूट, गावकऱ्यांत लागली चढाओढ

    Kovalam Village In Chennai : कोरोना लसीकरण मोहिमेमध्ये सर्व वर्गातील लोकांच्या सक्रिय सहभागासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या युक्त्यांचा अवलंब केला जात आहे. चेन्नईतील मच्छीमारांच्या गावात लोकांना लसीकरणाला प्रोत्साहित करण्यासाठी बिर्याणी व बक्षिसांची लकी ड्रॉ योजना सुरू करण्यात आली. एका स्वयंसेवी संस्थेने ही योजना आणली आहे. गावात लस घेणाऱ्यांच्या संख्येत यामुळे मोठी वाढ झाली आहे. Kovalam Village In Chennai Provides Free Biryani and many gifts to those who take the vaccine


    विशेष प्रतिनिधी

    चेन्नई : कोरोना लसीकरण मोहिमेमध्ये सर्व वर्गातील लोकांच्या सक्रिय सहभागासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या युक्त्यांचा अवलंब केला जात आहे. चेन्नईतील मच्छीमारांच्या गावात लोकांना लसीकरणाला प्रोत्साहित करण्यासाठी बिर्याणी व बक्षिसांची लकी ड्रॉ योजना सुरू करण्यात आली. एका स्वयंसेवी संस्थेने ही योजना आणली आहे. गावात लस घेणाऱ्यांच्या संख्येत यामुळे मोठी वाढ झाली आहे.

    कोवलमची या गावाची लोकसंख्या 14,300 आहे ज्यापैकी 6400 लोकं ही 18 वर्षांपेक्षा जास्त वयाची आहेत. एसटीएस फाऊंडेशनच्या सुंदर यांच्या मते, दोन महिन्यांत येथे केवळ 58 जणांनी लस घेतली होती. यामुळे फाउंडेशनसोबत समाजातील जागरूक लोक एकत्र आले आणि त्यांनी लसीबाबत असलेला संकोच दूर करण्यासाठी योजना तयार केली.

    दक्षिणेतील माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार एस.एन. रामदास फाउंडेशन, एसटीएस फाउंडेशन आणि चिराज ट्रस्टचे स्वयंसेवक एकत्र आले आणि लसीचे डोस घेण्याकरिता लोकांना मोफत भोजन देऊन आकर्षित करण्याचा निर्णय घेण्यात आला. एसटीएस फाउंडेशनचे विश्वस्त सुंदर म्हणाले, “गेल्या तीन दिवसांत आम्ही 345 जणांना लसीचे डोस दिले आणि लकी ड्रॉ योजनेने बर्‍याच जणांना आकर्षित केले आहे.”

    ही योजना अधिक आकर्षक बनविण्यासाठी त्यांनी साप्ताहिक लकी ड्रॉ तयार केला आहे. ज्यात मिक्सर, ग्राइंडर आणि सोन्याची नाणी यासारख्या विनामूल्य भेटवस्तू देण्याचा निर्णय घेण्यात आला. येथे बम्पर ड्रॉदेखील आहे यात विजेत्यांना रेफ्रिजरेटर, वॉशिंग मशीन आणि स्कूटरदेखील बक्षिसाच्या रूपात मिळणार जाईल.

    Kovalam Village In Chennai Provides Free Biryani and many gifts to those who take the vaccine

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    कर्नाटकच्या काँग्रेस सरकारची “कमाल”; 613 कोटींच्या भाड्याच्या यांत्रिक झाडूंनी बंगलोरचे रस्ते झाडणार!!

    Mehbooba Mufti : मेहबूबा म्हणाल्या- लाल किल्ल्यासमोर काश्मिरी समस्यांचे पडसाद; सरकारचे जम्मू-काश्मीर सुरक्षित ठेवण्याचे आश्वासन, पण दिल्लीच धोक्यात

    India US : टॅरिफनंतर भारत-अमेरिका यांच्यात पहिला करार; भारत आपल्या गरजेच्या 10% गॅस अमेरिकेकडून खरेदी करणार