वृत्तसंस्था
कोल्हापूर : कोल्हापूर, सांगली जिल्ह्याला गुरुवारी सायंकाळी वादळी वारा आणि ढगांच्या गडगडाटात आलेल्या अवकाळी पावसाने झोडपून काढले. कोल्हापूर शहरात तुफान गारा बरसल्या. या पावसाने शेतपिकांचे मोठे नुकसान झाले. जिल्ह्यात गेल्या दोन-तीन दिवसांपासून पावसाने हजेरी लावली. कागल तालुक्यातील गावांत गारांचा वर्षाव झाला होता. Kolhapur, Sangli was lashed by rains
केळी, पपईच्या बागांचे नुकसान
वाळवा तालुक्यात पावसाने थैमान घातले आहे. केळी, पपईच्या बागा आणि ग्रीन हाउसचे प्रचंड नुकसान झाले. तसेच, विजेचा खेळखंडोबा झाला होता. पुणे-बंगळुरू महामार्गालगतची झाडे पडली.
सांगली जिह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली. सायंकाळी अचानक ढगांची गर्दी झाली. विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला. सांगलीत हलक्या सरी कोसळल्या. जिल्ह्याच्या अनेक भागांत पावसाने हजेरी लावली. काही ठिकाणी हलक्या तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस झाला.
Kolhapur, Sangli was lashed by rains
महत्त्वाच्या बातम्या
- रेल्वे स्थानकावर परप्रांतीयांची पुण्यात लूट, २२ पोलिसांच्या मुख्यालयामध्ये बदल्या
- रेमडेसिवीर खरेदी करताय, हे सहा पी लक्षात ठेवा, हैद्राबादच्या पोलीसा आयुक्तांचे आवाहन
- शुभ वर्तमान , कोरोनाच्या उपचारात प्रभावी ठरतेय आयुष ६४ औषध
- पुणे मेट्रोची गौरवास्पद कामगिरी, मुठा नदीखालून भुयारी मार्ग पूर्ण
- उत्तर प्रदेशात ऑक्सिजन न मिळाल्याने सतरा रुग्णांचा मृत्यू
- महाराष्ट्र, मध्य प्रदेशपेक्षा राजधानी दिल्लीलाच कमी ऑक्सिजन का?, उच्च न्यायालयाने केंद्रा सरकारला फटकारले