• Download App
    ट्विटरने सांगितले राहुल गांधींचे अकाउंट सुरू होण्यामागचे कारण, बलात्कार पीडितेच्या कुटुंबाचे संमती पत्र दिल्यामुळे अकाउंट अनलॉक । Know Why Twitter unlocks Rahul Gandhi account, he submitted consent letter of rape victim family to use images says spokesperson

    ट्विटरने सांगितले राहुल गांधींचे अकाउंट सुरू होण्यामागचे कारण, बलात्कार पीडितेच्या कुटुंबाचे संमती पत्र दिल्यामुळे अकाउंट अनलॉक

    Twitter unlocks Rahul Gandhi account : काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि वायनाडचे खासदार राहुल गांधी यांचे ट्विटर खाते जवळजवळ एका आठवड्यानंतर ‘अनलॉक’ करण्यात आले. ट्विटरने शनिवारी सांगितले की, दिल्लीतील कथित बलात्कार आणि हत्या झालेल्या 9 वर्षीय मुलीच्या पालकांनी छायाचित्रांच्या वापरासाठी संमती पत्र सादर केल्यानंतर राहुल गांधी यांचे खाते पूर्ववत करण्यात आले. ट्विटरने असे म्हटले आहे की, त्या फोटोसंबंधित ट्वीट्सवर बंदी कायम राहील, कारण ते भारतीय कायद्यांचे उल्लंघन करतात. Know Why Twitter unlocks Rahul Gandhi account, he submitted consent letter of rape victim family to use images says spokesperson


    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि वायनाडचे खासदार राहुल गांधी यांचे ट्विटर खाते जवळजवळ एका आठवड्यानंतर ‘अनलॉक’ करण्यात आले. ट्विटरने शनिवारी सांगितले की, दिल्लीतील कथित बलात्कार आणि हत्या झालेल्या 9 वर्षीय मुलीच्या पालकांनी छायाचित्रांच्या वापरासाठी संमती पत्र सादर केल्यानंतर राहुल गांधी यांचे खाते पूर्ववत करण्यात आले. ट्विटरने असे म्हटले आहे की, त्या फोटोसंबंधित ट्वीट्सवर बंदी कायम राहील, कारण ते भारतीय कायद्यांचे उल्लंघन करतात.

    ट्विटरने राहुल गांधींची पोस्ट काढून टाकली होती, ज्यात त्यांनी एका अल्पवयीन बलात्कार पीडितेच्या पालकांच्या भेटीचा फोटो शेअर केला होता. ट्विटरने म्हटले होते की, त्यांनी नियमांनुसार ही पावले उचलली आहेत. पीटीआय या वृत्तसंस्थेनुसार ट्विटर प्रवक्त्याने म्हटले आहे की, “अपील प्रक्रियेचा एक भाग म्हणून @RahulGandhi(राहुल गांधी यांचे ट्विटर खाते) यांनी आमच्या तक्रार निवारण चॅनेलद्वारे संबंधित फोटो वापरण्यासाठी संमती फॉर्म सबमिट केले आहे.”

    भारतीय कायद्यानुसार बलात्कार प्रकरणात अल्पवयीन पीडितेची ओळख उघड करता येत नाही. कौटुंबिक फोटो ट्विट करणे हेही कायद्याचे उल्लंघन आहे आणि त्यामुळे खाती बंद करण्यात आली. ट्विटरने म्हटले आहे, “खाते लॉक असताना वापरकर्ता खाते उघडू शकतो, परंतु त्यांना नवीन ट्विट करण्याची परवानगी नाही. त्यांना हे वादग्रस्त ट्विट डिलीट करावे लागेल. मात्र, राहुल गांधी किंवा काँग्रेस आणि त्यांच्या नेत्यांनी हे ट्विट हटवले नाहीत. त्याऐवजी मुलीच्या कुटुंबीयांच्या वतीने एक संमतिपत्र देण्यात आले.”

    ट्विटरच्या प्रवक्त्याने सांगितले, “पीडित व्यक्तींच्या सुरक्षिततेचे आणि गोपनीयतेचे रक्षण करताना आम्ही अपिलाचे पुनरावलोकन करण्यासाठी आवश्यक प्रक्रियेचे पालन केले. फोटोंमध्ये दिसलेल्या लोकांनी दिलेल्या संमतीच्या आधारावर, आम्ही पुढील पावले उचलली आहेत. ट्विट्स (फोटोंशी संबंधित) काही काळासाठी थांबवण्यात आल्या आहेत आणि खात्याचा वापर पूर्ववत करण्यात आला आहे.”

    दुसरीकडे, राहुल गांधींचे ट्वीटर खाते पुन्हा सुरू होताच काँग्रेसने सत्यमेव जयते असे ट्वीट केले आहे. राहुल गांधी तसेच अनेक काँग्रेस नेत्यांनी मोदी सरकार ट्विटरचा वापर करून विरोधकांची मुस्कटदाबी करत असल्याचा आरोप केला होता. देशभरात 5 हजारांहून अधिक काँग्रेस नेत्यांची खाती सरकारच्या दबावाने बंद करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला होता. तथापि, ट्विटरने मात्र ही कारवाई भारतीय कायद्यांना अनुसरूनच करण्यात आल्याचे सांगितले आहे.

    Know Why Twitter unlocks Rahul Gandhi account, he submitted consent letter of rape victim family to use images says spokesperson

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य