• Download App
    डेबिट कार्ड घरीच विसरलात? काळजी करू नका, फक्त मोबाइलच्या मदतीने एटीएममधून काढता येतील पैसे । Know How To Withdraw Cash From ATM Using Smartphone Step by Step guide

    डेबिट कार्ड घरीच विसरलात? काळजी करू नका, फक्त मोबाइलच्या मदतीने एटीएममधून असे काढा पैसे

    How To Withdraw Cash From ATM Using Smartphone : साधारणपणे आपण आठवड्यातून एकदा तरी एटीएमवर हमखास जातोच. रोख रकमेची गरज असल्यावर कोणताही बँक खातेधारक आपल्या एटीएम कार्डाच्या साहाय्याने एटीएममधून पैसे काढून शकतो. परंतु बऱ्याचदा घाईघाईत एटीएम कार्डच घरी विसरले तर मोठी पंचाईत होते. परंतु यावर एक उपाय आहे, एटीएम कार्ड घरी विसरले तरी तुम्हाला मोबाइलच्या मदतीने पैसे काढता येऊ शकतात. हो हे खरे आहे! Know How To Withdraw Cash From ATM Using Smartphone Step by Step guide


    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : साधारणपणे आपण आठवड्यातून एकदा तरी एटीएमवर हमखास जातोच. रोख रकमेची गरज असल्यावर कोणताही बँक खातेधारक आपल्या एटीएम कार्डाच्या साहाय्याने एटीएममधून पैसे काढून शकतो. परंतु बऱ्याचदा घाईघाईत एटीएम कार्डच घरी विसरले तर मोठी पंचाईत होते. परंतु यावर एक उपाय आहे, एटीएम कार्ड घरी विसरले तरी तुम्हाला मोबाइलच्या मदतीने पैसे काढता येऊ शकतात. हो हे खरे आहे!

    एटीएममधून पैसे काढण्यासाठी आपल्याला कार्ड स्वाइप करावे लागते. ठरावीक पिन प्रविष्ट केल्यानंतरच आपल्याला एटीएममधून पैसे काढता येतात. मात्र, आता एका नव्या सुविधेमुळे आपल्याला एटीएममधून पैसे काढण्यासाठी कार्डचीही गरज लागणार नाही. केवळ मोबाईल फोनचा वापर करून आपल्याला एटीएममधून पैसे काढता येणार आहे. त्यामुळे कधी तुमचे कार्ड घरी विसरले तरी काळजी करू नका, तुम्हाला मोबाईल वापरून पैसे काढता येतील. एटीएममधून विना कार्डचे पैसे काढण्यासाठी मोबाईलमधील यूपीआय अॅप्सचा वापर करावा लागेल. या अॅप्सच्या माध्यमातून पैसे काढण्याची प्रक्रिया कशी आहे याची येथे माहिती देत आहोत…

    यूपीआयच्या माध्यमातून काढता येतील पैसे

    विना कार्डचे पैसे काढण्यासाठी ATM हे कोणत्याही UPI पेमेंटच्या अॅप्लिकेशनद्वारे ऑपरेट केले जाईल. BHIM, Paytm किंवा गुगल पे अशा अॅप्लिकेशनद्वारे ते ऑपरेट केले जाईल. एटीएम तयार करणाऱ्या कंपन्यांनी यूपीआयवर आधारित पैसे काढण्याची प्रणाली तयार केली आहे, त्याद्वारे एटीएममधून पैसे काढता येतात. काही बँकांनी अशी सुविधा असलेले एटीएम लावण्यास सुरुवातही केली आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ही सुविधा सर्वच एटीएमवर उपलब्ध असेल असे नाही. ज्या बँका अशा प्रकारचे एटीएम लावतील त्याच एटीएमवर ही सुविधा मिळते. त्यामुळं सुरुवातीला मर्यादित एटीएमवर ही सुविधा असेल.

    असे काढा मोबाइलच्या साहाय्याने पैसे

    1. पहिल्यांदा तुमच्या मोबाइलमध्ये कोणतेही UPI अॅप उघडला. उदा. Google Pay, BHIM, Paytm, PhonePe, Amazon.
    2. यानंतर तुम्हाला एटीएम स्क्रीनवर दिसत असलेला QR code स्कॅन करायचा आहे.
    3. यानंतर तुम्हाला केवळ हवी असलेली रोख रक्कम टाकून पैसे काढण्यासाठी proceed बटण दाबायचे आहे. लक्षात ठेवा, या प्रकारे तुम्हाला एका वेळी फक्त 5,000 रुपये काढता येतात.
    4. proceed बटण दाबल्यावर तुम्हाला तुमचा 4 किंवा 6 अंकी UPI PIN तेथे प्रविष्ट करायचा आहे.

    तंत्रज्ञानातील बदलामुळं आपलं जीवन अधिक सुकर होत आहे. त्यात अशा प्रकारच्या तंत्रज्ञानामुळे अनेकदा निर्माण होणाऱ्या अडचणींचा सामना करण्यासाठी मदत होईल. डिजिटल पेमेंट सिस्टीममुळे कॅशचा वापर कमी झाला. पण तरीही अनेक ठिकाणी कॅश लागते, अशावेळी कार्ड शोधत बसण्याऐवजी मोबाईलद्वारे तुम्हाला पैसे काढता येत असली तर कार्ड वागवण्याची गरजच उरणार नाही, नाही का!

    Know How To Withdraw Cash From ATM Using Smartphone Step by Step guide

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य

    Nishikant Dubey : खासदार निशिकांत दुबे म्हणाले- कोर्ट कायदा बनवणार असेल तर संसद बंद करा; सुप्रीम कोर्ट सीमा ओलांडत आहे

    Election Commission : 22 कोटी मतदार ‘आधार’शी लिंक नाहीत, घरोघरी जाऊन पडताळणी; निवडणूक आयोगाची मोहीम