• Download App
    संयुक्त राष्ट्रात चीनला खडसावणाऱ्या भारताच्या राजदूत प्रियांका सोहनी, जाणून घ्या त्यांच्याबद्दल... बेल्ड अँड रोड आणि सीपीईसीवरून मांडले परखड मत । Know About Indian Deplomat Priyanka Sohani, Lashesh Out China Over Belt And Road And CPEC In UN

    भारताच्या राजदूत प्रियांका सोहनी यांनी संयुक्त राष्ट्रांत चीनला खडसावले, जाणून घ्या त्यांच्याबद्दल… बेल्ड अँड रोड आणि सीपीईसीवरून मांडले परखड मत

    Indian Deplomat Priyanka Sohani : नुकताच भारताने संयुक्त राष्ट्रांच्या शाश्वत परिवहन परिषदेत चीनच्या बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह (बीआरआय) आणि चीन पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर (सीपीईसी) चा तीव्र निषेध नोंदवला आहे. भारतीय मुत्सद्दी प्रियांका सोहनी बोलत होत्या, तेव्हा त्यांचा माईक अचानक बंद झाला. तो दुरुस्त करण्यासाठी वेळ लागला. सर्व काही ठीक झाल्यानंतर, पुढील स्पीकरचा व्हिडिओ स्क्रीनवर प्ले होऊ लागला. पण संयुक्त राष्ट्राचे अवर सरचिटणीस लियू झेंमिन यांनी ते थांबवले. लियू चीनचे माजी उप-परराष्ट्र मंत्री राहिले आहेत. त्यांनी प्रियांका यांना आपले निवेदन पूर्ण करण्याची विनंती केली, त्यानंतर प्रियांकाने यांनी आपला मुद्दा सर्वांसमोर मांडला. Know About Indian Deplomat Priyanka Sohani, Lashesh Out China Over Belt And Road And CPEC In UN


    प्रतिनिधी

    नवी दिल्ली : नुकताच भारताने संयुक्त राष्ट्रांच्या शाश्वत परिवहन परिषदेत चीनच्या बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह (बीआरआय) आणि चीन पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर (सीपीईसी) चा तीव्र निषेध नोंदवला आहे. भारतीय मुत्सद्दी प्रियांका सोहनी बोलत होत्या, तेव्हा त्यांचा माईक अचानक बंद झाला. तो दुरुस्त करण्यासाठी वेळ लागला. सर्व काही ठीक झाल्यानंतर, पुढील स्पीकरचा व्हिडिओ स्क्रीनवर प्ले होऊ लागला. पण संयुक्त राष्ट्राचे अवर सरचिटणीस लियू झेंमिन यांनी ते थांबवले. लियू चीनचे माजी उप-परराष्ट्र मंत्री राहिले आहेत. त्यांनी प्रियांका यांना आपले निवेदन पूर्ण करण्याची विनंती केली, त्यानंतर प्रियांकाने यांनी आपला मुद्दा सर्वांसमोर मांडला.

    यानंतर प्रियांका यांनी चीनच्या बीआरआय प्रकल्पाबद्दल म्हटले की, आम्ही यामुळे असमान रूपाने प्रभावित झालो आहोत. सीपीईसी भारताच्या सार्वभौमत्वामध्ये हस्तक्षेप करते. सार्वभौमत्व आणि प्रादेशिक अखंडतेच्या मुख्य चिंतेकडे दुर्लक्ष करणाऱ्या उपक्रमाला कोणताही देश समर्थन देऊ शकत नाही.

    प्रियांकाच्या भाषणाच्या क्लिप भारतात जोरदार शेअर केल्या जात आहेत. यामुळे प्रियांका सोहनी यांच्याबद्दल जाणून घेण्याची प्रत्येकालाच उत्सुकता आहे.. प्रियांका सोहनी या भारतीय परराष्ट्र सेवेच्या अधिकारी आहेत. त्या बीजिंगमधील भारतीय दूतावासाच्या पहिल्या सचिव आहेत. प्रियांका 2016 पासून चीनमध्ये सेवेत आहेत. 2012 च्या बॅचच्या अधिकारी प्रियांका यांना 2012 मध्ये सर्वोत्कृष्ट प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्याचे सुवर्णपदक मिळालेले आहे.

    ऑक्टोबर 2019 मध्ये, जेव्हा चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग भारताच्या दौऱ्यावर आले होते, तेव्हा प्रियांका यांनी जिनपिंग यांच्या वक्तव्याचे भाषांतर केले आणि ते पंतप्रधान मोदींना समजावून सांगितले. जेव्हा जिनपिंग यांनी भारतीय संस्कृती आणि प्रतीकांबद्दल विचारले, तेव्हा प्रियांका यांनी जिनपिंगला ते स्पष्ट करण्यास मदत केली. इतिहास, कला, निसर्ग, तंत्रज्ञान आणि कायदा या पुस्तकात प्रियांका यांना विशेष रस आहे.

    Know About Indian Deplomat Priyanka Sohani, Lashesh Out China Over Belt And Road And CPEC In UN

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य