एएनआय या वृत्तसंस्थेनुसार, केएल राहुल न्यूझीलंडविरुद्ध टीम इंडियाचे नेतृत्व करेल कारण काही वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्यात येणार आहे. KL Rahul can lead Team India in T20 series against New Zealand, senior players will be rested
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघाचा सलामीवीर केएल राहुल न्यूझीलंडविरुद्धच्या आगामी T२० आंतरराष्ट्रीय मालिकेत भारताचे नेतृत्व करेल अशी चर्चा सुरू आहे.कारण भारतीय क्रिकेट नियामक मंडळ आयसीसी टी-२० विश्वचषकानंतर संघातील काही वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देणार आहे.अनेक भारतीय खेळाडू गेल्या काही महिन्यांपासून सतत खेळत आहेत.
वरिष्ठ खेळाडूंना देणार विश्रांती
एएनआय या वृत्तसंस्थेनुसार, केएल राहुल न्यूझीलंडविरुद्ध टीम इंडियाचे नेतृत्व करेल कारण काही वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्यात येणार आहे. विराट कोहली टी-२० विश्वचषकानंतर टीम इंडियाचे कर्णधारपद सोडणार आहे, ज्याची घोषणा त्याने यापूर्वी केली आहे. अशा स्थितीत बीसीसीआयला त्यांच्या उत्तराधिकार्याचे नाव लवकरच जाहीर करावे लागणार आहे. विराटने कर्णधारपद सोडल्यानंतर टी-२०चा कर्णधार बनण्यात रोहित शर्मा आघाडीवर आहे.
राहुलने कर्णधारपदाचा घेतला निर्णय
न्यूझीलंडविरुद्धच्या टी-२० मालिकेत राहुल कर्णधारपदासाठी सज्ज झाला आहे.वृत्तसंस्थेशी बोलताना बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, “विश्वचषकानंतर वरिष्ठ खेळाडूंना विश्रांतीची आवश्यकता असेल, हे गुपित नाही, राहुल हा टी-२० संघाचा महत्त्वाचा सदस्य आहे, तो नेतृत्व करणे जवळपास निश्चित आहे.”
T२० मालिकेचे वेळापत्रक
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन टी-२० सामन्यांची मालिका या महिन्यात खेळवली जाणार आहे.या मालिकेतील पहिला सामना १७ नोव्हेंबर रोजी जयपूर येथे होणार आहे. तर दुसरा सामना रांचीमध्ये १९ नोव्हेंबरला होणार आहे. त्याच वेळी, २१ नोव्हेंबर रोजी कोलकातामध्ये दोन्ही संघांमध्ये तिसरा आणि अंतिम सामना होणार आहे. टी-२० मालिकेनंतर दोन्ही संघांमध्ये दोन कसोटी सामन्यांची मालिकाही खेळवली जाणार आहे.
KL Rahul can lead Team India in T20 series against New Zealand, senior players will be rested
महत्त्वाच्या बातम्या
- मंदिराच्या सोन्यावर डोळा ठेवणारे तामीळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलीन यांना न्यायालयाचा दणका, सोने वितळविण्यास केली मनाई
- अफगणिस्थानच्या विजयावर भारताच्या आशा, तरच पोहोचू शकतो उपांत्य फेरीत
- एलपीजी सिलिंडर २६५ रुपयांनी महागला; दिवाळीच्या तोंडावरच गॅसचा उडाला भडका
- राज्य सरकार साडेसात दिवसच टिकणार; केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे खळबळजनक विधान