विशेष प्रतिनिधी
मुंबई : मध्य रेल्वेने चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत (एप्रिल-जून) ५.२५ कोटी रुपयांचा महसूल पार्सल वाहतुकीतून मिळवला आहे. गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत महसुलात ५७४ % वाढ झाली आहे. किसान रेल्वेचे यातील योगदान महत्वाचे ठरले आहे.Kisan Railway freight, 574% increase in parcel revenue for Central Railway in the first quarter
कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन असूनही, मध्य रेल्वेने या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत (एप्रिल-जून) पार्सल आणि वस्तूंच्या वाहतुकीत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. पहिल्या तिमाहीत (एप्रिल-जून) ५.२५ कोटी रुपयांचा महसूल पार्सल वाहतुकीतून मिळवला आहे. १८.५३ दशलक्ष टनाची मालवाहतूक केली.
किसान रेल्वे शेतकऱ्यांसाठी वरदान ठरली आहे. त्यांचे उत्पादन कमी वेळेत नव्या बाजारपेठेत पोहोचत आहे. मध्य रेल्वे सध्या देवळाली ते मुजफ्फरपूर, सांगोला ते आदर्श नगर दिल्ली, सांगोला ते शालीमार, रावेर ते आदर्श नगर दिल्ली आणि सावदा ते आदर्श नगर दिल्ली अशा ५ किसान रेल्वे चालवत आहे. आतापर्यंत किसान रेल्वेच्या ५३३ पेक्षा जास्त फेऱ्याद्वारे १.८२ लाख टन कृषी उत्पादने जसे की फळे, भाज्या, दुधासह अन्य नाशवंत वस्तूंची वाहतूक केली.
व्यापक विपणन प्रयत्न आणि व्यवसाय विकास युनिट्समुळे मध्य रेल्वेने कार्बन ब्लॅक फीड स्टॉक, अमोनिया, मिल स्केल लोह आणि स्टील, मोलॅसीस(मळी), जिप्सम, डोलोमाइट, कॉटन बेल इत्यादीं नवीन मालाची वाहतूक रेल्वेकडे वळविण्यात यश मिळविले आहे. ऑटोमोबाईल, कांदा, लोह आणि स्टील, साखर, एलपीजी आणि कोळसा यासारख्या सध्याच्या वाहतूकित वाढ करण्यात देखील यशस्वी झाली आहे.आगामी काळात देखील कामगिरी सुधारण्यासाठी मध्य रेल्वेचे प्रयत्न सुरू आहेत.
Kisan Railway freight, 574% increase in parcel revenue for Central Railway in the first quarter
महत्त्वाच्या बातम्या
- E-Shram Portal : आज मोदी सरकार 38 कोटी लोकांना भेट देणार, योजनांचा लाभ लोकांपर्यंत पोहोचेल
- अफगाणिस्तान : टोलो न्यूजच्या पत्रकाराच्या हत्येची बातमी, पत्रकाराकडून ट्विटर हँडलवर जिवंत असल्याचा खुलासा
- वेगळ्या विदर्भ राज्याच्या मागणीसाठी जेलभरो आंदोलन, आंदोलनात आले केवळ आठ जण
- सावधान, डेल्टा प्लसचा २४ जिल्ह्यांत प्रादुर्भाव; सर्वाधिक रुग्ण रत्नागिरी, जळगाव जिल्ह्यात