• Download App
    किसान मोर्चाला भाजपच्या विजयाचा मोठा धक्का, पुन्हा आंदोलन सुरू करण्याची तयारी|Kisan Morcha got a big blow by BJP's victory, ready to start agitation again

    किसान मोर्चाला भाजपच्या विजयाचा मोठा धक्का, पुन्हा आंदोलन सुरू करण्याची तयारी

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : विधानसभा निवडणुकीत भाजपचा मोठा विजय झाल्याने किसान मोचार्ला मोठा धक्का बसला आहे. किसान मोचार्ने निवडणुकीत भाजपला कडाडून विरोध केला होता. मात्र, तरीही भाजपचा विजय झाला. त्यामुळे पुन्हा एकदा आंदोलनाची तयारी तयारी किसान मोर्चाने सुरू केली आहे.Kisan Morcha got a big blow by BJP’s victory, ready to start agitation again

    संयुक्त किसान मोर्चा सोमवारी दिल्लीत बैठक घेणार आहे. यावेळी आंदोलन पुन्हा सुरू करणे आणि भविष्यातील योजनांवर चर्चा होऊ शकते. यामुळे शेतकरी पुन्हा एकदा दिल्लीच्या सीमेवर परत येऊ शकतात. किसान मोर्चाने उत्तर प्रदेशमध्ये भाजपचा पराभव करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रचार केला असला तरी, शेतकऱ्यांचे लक्ष्य केवळ एका निवडणुकीपुरते नव्हते,



    असे संघटनेच्या निर्णय घेणाऱ्या पॅनेलच्या सदस्याने सांगितले. उत्तर प्रदेशात शेतकऱ्यांच्या प्रचंड विरोधाला झुगारून भाजपने पुन्हा एकदा निवडणूक जिंकली. यावेळेस जागांमध्ये थोडी घट झाली असली तरी पक्षाला पूर्ण बहुमत मिळवण्यात यश आले आहे.

    सत्तेत कोणताही पक्ष असो, आमच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन सुरूच राहणार आहे. मला उत्तर प्रदेश निवडणुकीबद्दल बोलायचे नाही. सर्व काही संपले आहे. परंतु, शंभर टक्के चळवळ सुरू राहील. मी एसकेएमसोबत आहे, असे भारतीय किसान युनियनचे नेते आणि शेतकरी आंदोलनातील प्रमुख चेहरा राकेश टिकैत यांनी सांगितले.

    Kisan Morcha got a big blow by BJP’s victory, ready to start agitation again

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!

    Karnataka : कर्नाटकच्या माजी डीजीपीच्या हत्येप्रकरणी पत्नीला अटक

    Rahul Gandhi : कर्नाटकनंतर राहुल गांधी यांचे हिमाचल-तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना पत्र