विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : केंद्र सरकारचा निषेध करण्यासाठी २६ मे रोजी काळा दिन पाळला जाणार असल्याचे संयुक्त किसान मोर्चाच्या वतीने आज जाहीर करण्यात आले.Kisan Morcha declares new andolan
कृषी कायद्यांविरोधात दिल्लीत सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनास त्या दिवशी सहा महिने पूर्ण होत आहे.मागील सहा महिन्यांच्या काळामध्ये या आंदोलनाने वेगवेगळी वळणे घेतली.
यामुळे तिकरी, सिंघू आणि गाझीपूर हा सीमाभाग हा आंदोलनाचा केंद्रबिंदू बनले.शेतकरी नेते बलबीरसिंग राजेवाल यांनी सांगितले की सर्व शेतकऱ्यांनी २६ मे रोजी आपले घर, वाहने आणि दुकाने यांच्यावर काळे झेंडे लावून कृषी कायद्यांचा विरोध करावा.
आंदोलनास येत्या २६ मे रोजी सहा महिने पूर्ण होत असून केंद्रामध्ये मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपचे सरकार स्थापन होऊन सात वर्षे पूर्ण होत आहे. हा दिवस काळा दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. देशभरातील लोकांनी या आंदोलनामध्ये सहभागी होऊन पाठिंबा द्यावा,