विशेष प्रतिनिधी
मुंबई – फरारी उद्योगपती विजय मल्ल्याचे किंगफिशर एअरलाइन्स लिमिटेडचे मुख्यालय म्हणजेच किंगफिशर हाऊस अखेर लिलावात विकले गेले आहे. हैदराबादच्या सॅटर्न रियल्टर्स या बांधकाम व्यावसायिकाने मल्ल्याचे किंगफिशर हाऊस ५२.२५ कोटी रुपयांना विकत घेतले. Kingfisher house sold at 52 cr.
मुंबई विमानतळाजवळ ही वास्तू आहे. या हाऊसच्या विक्रीसाठी बँकांनी १५० कोटी रुपये किंमत ठरवली होती; परंतु या किमतीच्या किती तरी कमी किमतीत ही मालमत्ता विकली गेली आहे.
या मालमत्तेचे एकूण क्षेत्रफळ १,५८६ चौरस मीटर इतके आहे. मार्च २०१६ मध्ये सर्वात आधी बॅंकांनी या मालमत्तेचा लिलाव करण्याचा प्रयत्न केला होता. त्या वेळेस बॅंकांनी या मालमत्तेची किंमत १५० कोटी रुपये निश्चित केली होती. लिलावाचे तब्बल आठ प्रयत्न करूनदेखील किंगफिशर हाऊसच्या विक्रीला यश आले नव्हते. अखेर नवव्या प्रयत्नात हा लिलाव यशस्वी ठरला आहे.
लिलावातून मिळणारे पैसे गुंतवणूकदारांना मिळणार आहेत. किंगफिशर एअरलाइन्स कर्ज प्रकरणात ईडी आणि सीबीआय चौकशी करत असताना मल्ल्या देशातून फरारी झाला होता. तो सध्या ब्रिटनमध्ये असून त्याच्या प्रत्यार्पणासाठी भारताकडून प्रयत्न सुरू आहेत.
Kingfisher house sold at 52 cr.
महत्त्वाच्या बातम्या
- WATCH : लेबनॉनमध्ये इंधनाच्या टँकरचा भीषण विस्फोट, 28 जणांचा मृत्यू, संतप्त जमावाने टँकर मालकाचे घरही जाळले
- रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी दिल्या स्वातंत्र्यदिनाचे शुभेच्छा, म्हणाले- आंतरराष्ट्रीय प्रश्न सोडवण्यात भारताची महत्त्वपूर्ण भूमिका
- Lockdown In Maharashtra : ‘तर महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाऊन’, स्वातंत्र्यदिनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिला थेट इशारा