वृत्तसंस्था
तिरुवनंतपुरम : केरळमध्ये लव जिहाद आणि त्याचबरोबर नार्कोटिक्स जिहाद सुरू आहे, अशी टीका करणाऱ्या बिशप जोसेफ कलातरंग यांच्याविरोधात केरळमधील डावे सरकार खटला दाखल करणार नाही. ही माहिती मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी दिली आहे. Kerala Govt isn’t considering taking any case against the Bishop.
ते म्हणाले की केरळमध्ये काही समाज घटक धर्मांध आहेत. परंतु संपूर्ण समाज धर्मनिरपेक्ष आहे. केरळचे सरकार मतस्वातंत्र्य मानते. त्यामुळे जोसेफ कल्लातरंग यांच्याविरुद्ध सरकार खटला दाखल करणार नाही.
लव जिहादचा मुद्दा एका कॅथलिक ख्रिश्चन धर्म गुरुने उपस्थित केल्याने केरळच्या डाव्या सरकारची त्यांच्या विरोधात खटला दाखल करण्याची हिंमत होत नाही, अशी टीका भाजपने आधीच केली आहे. आज त्याच्यावर मुख्यमंत्री विजयान यांनी वक्तव्य करून एक प्रकारे शिक्कामोर्तबच केले आहे.
यावरून सोशल मीडियात लव जिहाद तसेच नारकोटिक्स जिहाद या मुद्द्यांवरून जोरदार चर्चा सुरू झाली आहे. त्याच वेळी केरळच्या डाव्या पक्षांच्या सरकारच्या दुटप्पी भूमिकेवर देखील नेटिझन्सनी प्रश्नचिन्ह लावली आहेत. लव जिहादचा मुद्दा हिंदू समाजातील नेत्यांनी उपस्थित केल्यावर त्यांच्यावर टीकेचा भडीमार केला जातो. पण तोच मुद्दा ख्रिश्चन धर्मगुरु जेव्हा उपस्थित करतात तेव्हा डाव्या पक्षाच्या सरकारची त्यांच्या विरोधात खटला दाखल करण्याची हिम्मत होत नाही, अशी बोचरी टीका नेटिझन्सनी सोशल मीडिया केली आहे.
Kerala Govt isn’t considering taking any case against the Bishop.
महत्त्वाच्या बातम्या
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजवटीतअल्पसंख्यांक शंभर टक्के सुरक्षित, द्वेषाच्या घटना वाढल्याचा आरोप चुकीचा, राष्ट्रीय अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष इक्बाल सिंह लालपुरा यांचा निर्वाळा
- महामार्गावरील सुसाट वेगाला आवर, वेग मर्यादा १२० किलोमीटरपर्यंत वाढविण्याच्या केंद्राच्या सूचनेला मद्रास उच्च न्यायालयाची स्थगिती
- भवानीपूरमध्ये सोला अना मशीदीचा आशिर्वाद घेऊन ममता बॅनर्जी यांची प्रचाराला सुरूवात, भाजपने केला घाम फुटल्याचा आरोप
- वीज बिल थकबाकी वसुलीसाठी डाव, सरकारला सावकारी वसुली करायचीय, देवेंद्र फडणवीस यांचा आरोप