Kerala Coronavirus Cases : देशात सर्वाधिक कोरोना रुग्ण सध्या केरळमध्ये आढळत आहेत. संध्याकाळी 6 च्या सुमारास आरोग्य विभागाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांमध्ये 32 हजार 801 रुग्णांची नोंद झाली आहे. तर 179 रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे. याच काळात 18 हजार 573 रुग्ण संसर्गातून बरेही झाले आहेत. Kerala Coronavirus Cases Today More than 32 Thousand Patients Found in 24 Hours 179 deaths
वृत्तसंस्था
नवी दिल्ली : देशात सर्वाधिक कोरोना रुग्ण सध्या केरळमध्ये आढळत आहेत. संध्याकाळी 6 च्या सुमारास आरोग्य विभागाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांमध्ये 32 हजार 801 रुग्णांची नोंद झाली आहे. तर 179 रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे. याच काळात 18 हजार 573 रुग्ण संसर्गातून बरेही झाले आहेत.
आरोग्य विभागाने सांगितले की, राज्यात संक्रमणाचे प्रमाण वाढून 19.22 झाले आहे. सध्या 1,95,254 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 37,30,198 रुग्ण संसर्गातून बरे झाले आहेत आणि 20 हजार 313 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
केरळमध्ये गुरुवारी 30,007 कोरोना रुग्ण आढळले होते. बुधवारी 31,445, मंगळवारी 24,296, सोमवारी 13,383, रविवारी 10,402 आणि शनिवारी 17,106. केंद्र सरकारने गुरुवारी सांगितले होते की, देशात गेल्या एक आठवड्यात कोविड-19 च्या एकूण प्रकरणांपैकी 58.4 टक्के रुग्ण केरळमधून आले आहेत.
ओणम सणानंतर, राज्यातील तज्ज्ञांच्या मते संसर्गाचे प्रमाण (टीपीआर) 20 टक्क्यांपेक्षा जास्त असू शकते आणि संसर्गाची प्रकरणेही वाढतील, असा अंदाज आरोग्य तज्ज्ञांनी वर्तवला होता. केरळमधील बकरीद सणानंतर 27 जुलैपासून दररोज सुमारे 15,000 किंवा त्याहून अधिक कोरोनाची नवीन प्रकरणे येत आहेत. बकरीददरम्यान सरकारने काही दिवसांसाठी कोविडशी संबंधित निर्बंध शिथिल केले होते.
Kerala Coronavirus Cases Today More than 32 Thousand Patients Found in 24 Hours 179 deaths
महत्त्वाच्या बातम्या
- देशाचा जीडीपी 9.5% राहण्याचा अंदाज, महागाईसुद्धा कमी होणार – RBI गव्हर्नर शक्तिकांत दास
- Sarada Scam : शारदा घोटाळ्याच्या आरोपपत्रात तृणमूल सरचिटणीस कुणाल घोष यांचे नाव, घोष म्हणाले- केंद्राकडून सूड भावनेने कारवाई
- WATCH : काबूल विमानतळ स्फोटाचा धक्कादायक व्हिडिओ, रक्ताचे वाहिले पाट, चहुकडे विखुरले मृतदेह, 110 जणांचा मृत्यू
- WATCH : माजी आयपीएस अधिकारी अमिताभ ठाकूर यांना अटक, सुप्रीम कोर्टाबाहेर जाळून घेणाऱ्या रेप पीडितला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा आरोप
- नारायण राणेंची पुन्हा टीका, म्हणाले- “घरात, पिंजऱ्यात राहून काम करणारा मुख्यमंत्री पाहिला नाही!”