वृत्तसंस्था
नवी दिल्ली : दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना आता केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांचा पाठिंबा मिळाला आहे. विजयन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून सिसोदिया यांच्या अटकेप्रकरणी निषेध नोंदवला आहे. सिसोदिया आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांना राजकीय षडयंत्राचा भाग म्हणून गोवले जात असल्याचा आरोप त्यांनी आपल्या पत्रात केला आहे. Kerala Chief Minister’s support to Sisodia Letter to PM Modi, said- Agencies are harassing, arrest is wrong
विजयन म्हणाले की, अनेक विरोधी राजकीय पक्ष आणि अनेक राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी याप्रकरणी निषेध नोंदवला आहे. विजयन यांनी लिहिले की, ‘माननीय पंतप्रधानांचे लक्ष वेधण्यासाठी मी हे पत्र लिहित आहे. विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसह अनेक विरोधी पक्ष मनीष सिसोदिया यांच्या अटकेला विरोध करत आहेत. या अटकेमुळे केंद्रीय एजन्सीचा गैरवापर होत असल्याचा युक्तिवाद आणखी मजबूत झाला आहे.’
काहीही आक्षेपार्ह आढळले नाही
विजयन म्हणाले, ‘सिसोदिया यांच्या प्रकरणात रोख रकमेसारखी कोणतीही आक्षेपार्ह वस्तू जप्त करण्यात आलेली नाही. अशा परिस्थितीत एजन्सी चुकीच्या पद्धतीने विरोधी पक्षाच्या नेत्यांना लक्ष्य करत आहेत. ते जनतेने निवडून दिलेले प्रतिनिधी असून तपास यंत्रणांनी समन्स बजावल्यावर ते त्यांच्यासमोर हजरही राहिले आहेत.
Kerala Chief Minister’s support to Sisodia Letter to PM Modi, said- Agencies are harassing, arrest is wrong
महत्वाच्या बातम्या
- PMPML महिलांना घडवणार दर महिन्याचा 8 तारखेला मोफत प्रवास
- केनियामध्ये ड्रॅगनला विरोध : चिनी व्यावसायिकांविरोधात रस्त्यावर उरतली जनता, चायनीज मस्ट गोच्या घोषणा
- गुप्तचर यंत्रणांचा जवानांना अलर्ट जारी : सैनिक वा त्यांच्या कुटुंबीयांनी चायनीज फोन वापरू नयेत
- नागालँड-मेघालयात आज शपथविधी सोहळा : कॉनरॅड संगमा-नेफियू रिओ पुन्हा घेणार पदभार, PM मोदी-अमित शहांची उपस्थिती