Kerala Assembly Election Results : केरळमधील पलक्कड मतदारसंघात भाजपचे ई. श्रीधरन यांचा पराभव झाला आहे. मेट्रो प्रकल्पांतील त्यांच्या अभूतपूर्व योगदानामुळे श्रीधरन यांना मेट्रो मॅन म्हणून ओळखले जाते. या निवडणुकीत केरळमध्ये भाजपने निवडणूक प्रचारावर बराच भर दिला होता. राज्यात मुख्य संघर्ष कॉंग्रेसप्रणीत यूडीएफ आणि डाव्या आघाडीच्या एलडीएफ यांच्यात होता. तथापि, येथे भाजपनेही मोठी मेहनत घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यासह भाजपने अनेक केंद्रीय मंत्र्यांना राज्यात प्रचारासाठी उतरवले होते. 2016 मध्ये केरळमध्ये भाजपला 1 जागा मिळाली. Kerala Assembly Election Results Metroman BJP candidate from Pallakad Sreedharan defeated by Congress Shafi Parambil
विशेष प्रतिनिधी
पलक्कड : केरळमधील पलक्कड मतदारसंघात भाजपचे ई. श्रीधरन यांचा पराभव झाला आहे. मेट्रो प्रकल्पांतील त्यांच्या अभूतपूर्व योगदानामुळे श्रीधरन यांना मेट्रो मॅन म्हणून ओळखले जाते. या निवडणुकीत केरळमध्ये भाजपने निवडणूक प्रचारावर बराच भर दिला होता. राज्यात मुख्य संघर्ष कॉंग्रेसप्रणीत यूडीएफ आणि डाव्या आघाडीच्या एलडीएफ यांच्यात होता. तथापि, येथे भाजपनेही मोठी मेहनत घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यासह भाजपने अनेक केंद्रीय मंत्र्यांना राज्यात प्रचारासाठी उतरवले होते. 2016 मध्ये केरळमध्ये भाजपला 1 जागा मिळाली.
एक्झिट पोलमध्ये यावेळी भाजपला 1 ते 5 जागा मिळतील, असा अंदाज वर्तवण्यात आला होता. यातील एक जागा पलक्कडचीही होती. येथून भाजपने निवडणुकीत सुप्रसिद्ध मेट्रोमॅन ई. श्रीधरन यांना उतरवले होते. मेट्रोसारख्या वेगाने केरळलाही विकासाच्या मार्गावर नेण्याचे आश्वासन देत ई. श्रीधरन पहिल्या निवडणुकीसाठी सज्ज झाले होते. तथापि, कॉंग्रेसच्या शफी परमबिल यांच्याकडून त्यांचा पराभव झाला. 2016 मध्ये शफी यांनी भाजपच्या शोभा सुरेंद्रन यांचा पराभव केला होता. 2016 मध्ये या जागेवर शफी परमबिल यांना 41.77 टक्के मते मिळाली होती. आता पुन्हा एकदा त्यांचा येथून विजय झाला आहे.
Kerala Assembly Election Results Metroman BJP candidate from Pallakad Sreedharan defeated by Congress Shafi Parambil
महत्त्वाच्या बातम्या
- Bengal Result : ममतांच्या बंगाल विजयाचा राष्ट्रीय राजकारणावर परिणाम काय?, वाचा सविस्तर…
- Bengal Election Result Live : नंदिग्राममध्ये दिग्गज ममतांनाही फुटला होता घाम, अवघ्या 1200 मतांनी झाला सुवेंदू अधिकारींचा पराभव
- अजून एक काश्मिर तयार होतोय…! बांग्लादेशी आणि रोहिंग्या हीच ममतांची सर्वात मोठी ताकद;कंगनाचा हल्लाबोल
- Pandharpur assembly elections 2021 results analysis : विठ्ठलाच्या पायी कडाडली वीज; ठाकरे – पवारांच्या महाविकास आघाडीच्या “खंजीर प्रयोगाला” जनतेची चपराक
- Belgaum Bypoll Result Live : ५९ राऊंडनंतर सतीश जारकीहोळी ८९७६ मतांनी आघाडीवर; बेळगाव पोटनिवडणुकीत रंगत